तक्रारीवरून पोलिसांनी एन. सी. ची. नोंद केली!
मंगरूळपीर (Women Sarpanch) : महिला सरपंचास शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार पोलीसात दाखल करण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार अर्जदार सौ सुनिता अजय खिराडे वय 41 वर्ष, रा नविन सोनखास यांनी तक्रार दिली की, अर्जदार हे ग्रामपंचायत जांब (Gram Panchayat Jamb) येथील सरपंच असुन दि 27/06/2025 रोजी ग्रामपंचायत जांब यांची मासिक सभा शहापुर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सुरु असतांना गैरअर्जदार पद्मा मोहड, महिंद्र मनवर, प्रमोद भगत, गौरव इंगळे रा. नविन सोनखास ता. मंगरुळपीर यांनी म्हटले की, आमचे अतीक्रमन जागेमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. असे म्हणून अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी शिवीगाळ व मारण्याची धमकी (Threat) दिल्याने या तक्रारीवरून पोलिसांनी एन. सी. ची. नोंद केली आहे. तर पद्मा मोहड रा.नवीन सोनखस यांनी तक्रार दिली की, अर्जदार व ग्रामवासी (Villagers) हे पावसाचे घरात शिरल्याने ग्राम पंचायत कार्यालय शहापुर 27 जून रोजी समस्या मांडण्याकरीता गेले असता, सरपंच सुनिता खिराडे व तिचे पती अजय खिराडे हे म्हणाले की, कोणी मेल तर नाही न, तुम्हाला पाहून घेतो. अशी जिवाने मारण्याची धमकी दिली. यावरुन पोलिसांनी (Police) एन. सी. ची. नोंद केली आहे.