पाणी प्रश्नावर महिलांची निर्दशने
पाण्याच्या समस्येने गावकरी अस्वस्थ
उसर्रा (Village Water Supply) : मोहाडी तालुक्यातील उसर्रा गावामध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे. यावर्षी तर सखोल पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. त्याचबरोबर गावातील विहिरी कोरड्या (Village Water Supply) पडलेल्या आहेत. अनेकदा ही समस्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असले तरी, मात्र याकडे प्रशासनाकडून गांभीर्यपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
उसर्रा गावातील नागरिक गेल्या चार महिन्यांपासून पाण्याच्या समस्येवर (Village Water Supply) चिंतातूर आहेत. त्यामुळे त्रस्त असलेल्या महिलांनी बुधवारला रिकामी भांडी घेऊन हातपंपाच्या बाजूला एकजूट होऊन ग्रामपंचायत विरोधात घोषणा करून निदर्शने केली. गेल्या अनेक वर्षांपासून उसर्रा गावात पिण्याच्या पाण्याचा समस्येबाबतचा प्रश्न उद्भवला आहे व ग्रामस्थांचे हालचे बेहाल झाले आहेत. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या नियोजनाने एक लक्ष क्षमतेच्या जल स्वराज्य प्रकल्पच्या योजनेअंतर्गत बनवण्यात आलेली पाण्याची टाकी निरुपयोगी झालेली असून जलस्वराज्य प्रकल्प योजना ही कुचकामी ठरत आहे, असा आरोप पाण्याअभावी त्रस्त झालेल्या नागरिकांनी केला आहे.
पाण्याच्या समस्येच्या प्रश्न न सुटल्यास ग्रामपंचायत समोर जाऊन धगराफेक (हांड्डफोड) आंदोलन करणार असल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
गावातील महिलांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले की उसर्रा गावातील प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.२ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून (Village Water Supply) पाण्याच्या समस्येची मार महिलांना सोसावी लागत आहे. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत व ग्राम अधिकारी यांना या संदर्भात अनेक पत्र व्यवहार करून समस्या निदर्शनास आणून देण्याच्या महिलांनी अनेकदा प्रयत्न केला आहे.
परंतू गावातील सरपंच व ग्राम अधिकारी (सचिव) हे मात्र गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यास तयार नाही. इतकेच नाही तर शासन निर्णयानुसार कायद्याच्या कसोटीत ग्राम अधिकारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असले तरी ग्राम अधिकारी हे मुख्यालयी व नोकरीच्या ठिकाणी राहत नसून ते एका मोठ्या शहरांमध्ये राहतात व शासन निर्णयाला केराची टोपली दाखवतात आणि गावातील नागरिक ग्राम अधिकारी बाहेर राहत असल्याने त्यांना भ्रमणध्वनीवर फोन करतात व त्यांच्यासमोर समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात.
पण एम. आर. वडस्कर उसर्रा गावातील ग्राम अधिकारी हे नागरिकांचे फोन घेत नाही व लोकांच्या समस्या ऐकून घेत नाही. समस्येवर निराकरण करत नाही. एवढेच नाही तर ‘मला भलत्याच वेळेस फोन करू नका, काही तक्रार करायची असेल तर सरपंचाला सांगा, अशा शब्दात नागरिकांशी गैरवर्तणूक व अपमानग्रस्त वागणूक करतात व अनेक नागरिकांचे मोबाईल नंबर ब्लॉक लिस्टमध्ये घालतात, असाही आरोप गावकर्यांनी केले आहे.
पण हे कितपत योग्य आहे, याचा खुलासा खंडविकास अधिकारी हरीणखेडे यांनी पंचायत समिती मोहाडी यांनी नागरिकांसमोर करावा, त्याचबरोबर आमच्या गावातील पाणीटंचाईची समस्या वेळीच मार्गी न लागल्यास आम्हाला ग्रामपंचायत समोर बसून घागरा फेक आंदोलन छेडावे लागेल, याची जबाबदारी ग्रामपंचायत व प्रशासनाची असेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. (Village Water Supply) महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलस्वराज्य प्रकल्प व जलजीवन मिशन अंतर्गत नळाला फक्त दोन गुंड पाणी येतो. दोन गुंड पाण्यामध्ये एक दिवस व रात्र काढावे तरी कसे, असेही महिलांनी प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केले आहे. पाण्याअभावी मात्र नागरिकांबरोबरच गुराढोरांचेही खूप बेहाल झालेले आहे.
अनेक वर्षांपासून नागरिकांना शुद्ध व पिण्यायोग्य पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांकडून ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल आक्रोश व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षापासून प्रभाग क्र.१,२ व ३ मध्ये नळाचे पाणी गरज भागवण्यापुरतेही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. (Village Water Supply) एवढेच नाही तर उसर्रा गावामध्ये एकूण २२ हातपंप असल्याची माहिती आहे. त्यामधून फक्त ८ ते १० हात पंपांना पाणी येते. पण तेही मात्र पुरेशी येत नाही.
लोक आंघोळ करून पाणी प्यायला व्याकूळ आहेत. (Village Water Supply) रखडत्या उन्हात लोकांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळ करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला आहे. या ग्रामपंचायतच्या व ग्राम अधिकार्याच्या हिटलरशाही कारभाराने उद्भवलेल्या समस्येकडे व नागरिकांच्या तक्रारीकडे पंचायत समिती मोहाडी येथील खंडविकास अधिकारी हरिणखेडे, हे कोणती भूमिका बजावतात, याकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.