काँग्रेसकडून पालकमंत्री,जिल्हाधिकार्यांवर पक्षपाताचा आरोप
विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्याचा पत्रकार परिषदेतून इशारा
यवतमाळ (Yavatmal Municipal Council) : जिल्हाधिकारी कार्यालयात ३१ मे रोजी पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री मदन येरावार यांच्या सह प्रशासनातील सर्व अधिकार्यांच्या उपस्थितीत यवतमाळ शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून निर्णय घेण्याच्या अनुशंगाने बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीमध्ये (Yavatmal Municipal Council) यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी हेतूपुरस्परपणे डावलण्यात आल्याचा आरोप यवतमाळ काँग्रेस शहराध्यक्ष बबलु देशमुख यांनी विश्रामभवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
तसेच शासन व प्रशासनाच्या या पक्षपाती कृत्याचा निषेध काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आला. (((Yavatmal Municipal Council)) यवतमाळ शहर विकासाबाबतच्या बैठकीत विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना निमंत्रण न देता, माजी आमदार मदन येरावार यांना समाविष्ट करून घेऊन शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. माजी आमदारांना बोलावयाला हरकत नाही, तो पालकमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे. पण एखादी शासकीय आढावा बैठक, त्या मतदारसंघाची,त्याच मतदारसंघात आहे आणि विद्यमान आमदारांचा प्रोटोकॉल असताना सुद्धा त्यांना आढावा बैठकीचे निमंत्रण नाही किंवा त्यांना यात समावेश करून घेतला नाही.
म्हणजेच त्यांचा एक प्रकारे अवमान शासन आणि प्रशासनाने केला. हा जो अवमान आहे तो व्यक्तिगत आ. बाळासाहेब मांगुळकर यांचा नसून यवतमाळ मतदार संघातील संपूर्ण जनतेचा अवमान असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून या घटनेचा जाहीर आणि तीव्र निषेध करतो अशी भावना त्यांनी मांडली. तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेच्या अवमाना बाबतचाr लेखी तक्रार आ.मांगुळकर यांनी मुख्यमंत्री,मुख्य सचिव यांच्याकडे केली असून विधानसभेमध्ये प्रश्न मांडून,त्याची सभागृहात चर्चा घडवून आणली जाईल.
त्याप्रमाणे हक्कभंगासारख्या या गंभीर प्रकरणामध्ये राज्यस्तरावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात राज्यपालांकडेही तक्रार दाखल करण्याबाबत निर्णय घेतल्या जाणार असल्याचेही यवतमाळ काँग्रेस शहराध्यक्ष बबलू देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष रमेश भिसनकर,बाजार समिती सभापती रवी ढोक,संतोष बोरले, अनंत सूर्यकार, जरार भाई, कैलास गोंडाने, लाली तेलगोटे, अॅड.जयसिंग चव्हाण, नामदेवराव दोनाडकर, चंद्रकांत दोनाडकर, अशोकराव पुसदकर, वृषभ गुल्हाने, किरण दाभाडकर, नंदू कुडमेथे, नरेश कळंभे व इतर उपस्थित होते.