वर्षभरापासून तुटलेले रॉड उचलण्याचीही घेईना तसदी
यवतमाळ (Yavatmal Road divider) : शहरामध्ये बसस्थानक चौकापासून आर्णी रोड,धामनगाव रोड,दारव्हा रोड,नागपूर रोडचे सिमेंटीकरण झालेले आहे. नागपूर रोड वगळता तिन्ही दिशेला बनविण्यात आलेल्या सिमेंट रोडवर दुभाजन असून त्यावर स्टिलचे आतून पोकळ असलेले रॉड बसविण्यात आले आहे. मात्र रस्ते तयार झाल्यापासून या मार्गांवर विविध अपघातात (Yavatmal Road divider) दुभाजक क्षतीग्रस्त झाले असून काही ठिकाणी स्टिल रॉड चे चेंदामेंदा झालेले असतानाही,अपघात स्थळवरील दुभाजकांची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सवड मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ शहरामध्ये आर्णी रोडवर वनवासी मारोती मंदीर ते बसस्थानक चौक,दारव्हा रोडवर लोहारा चौक ते बसस्थानक चौक, धामनगाव रोडवर न्यायालय ते बसस्थानक चौक असे वाहतुकीसाठी महत्वपूर्ण सिमेंट रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. या रस्त्यांवर दुभाजक असून काही भागांमध्ये सिमेंट रोडवर स्ट्रिल चे रॉड दुभाजकांवर (Yavatmal Road divider) बसविण्यात आले असून त्यात झाडे व वेलींचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर मागील एक ते दोन वर्षात अनेक वेळा अनेक ठिकाणी अपघात झाले आहे.त्या अपघातामध्ये दुभाजक क्षतीग्रस्त होवून तुटलेले आहेत.
दुभाजकांवर बसविण्यात आलेल्या स्टिल रॉड चा तर चेंदामेंदा झालेला आहे. अशा स्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्षतीग्रस्त झालेल्या दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून स्टिल रॉड नव्याने बसवून घेणे कर्तव्याचा भाग म्हणून अपेक्षित आहे. मात्र आजही आर्णी रोडवरील ममता सुपर बाजार लगत, आयुर्वेदीक कॉलेज जवळील पेट्रोल पंपा लगत, अभ्यंकर कन्या शाळे लगत तसेच दारव्हा रोडवरील टिव्हीएस शो रूम समोर, देवगड हॉटेल समोर, झुलेलाल प्राउंड हॉटेल समोर, उद्योग भवन समोर,नेताजी नगर लगतच्या भागामध्ये अपघात क्षतीग्रस्त झालेले दुभाजक व स्टिल चे रॉड जसच्या तसे आहेत.
त्यांची कुठलीही दुरुस्ती करण्याची ईच्छा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा कंत्राटदारला करावीशी वाटत नाही. (Yavatmal Road divider) दुभाजकावरील तुटलेले स्टिलचे रॉडही सार्वजिक बांधकाम विभागाला घटना स्थळावरून उचलावेशे वाटत नसल्याबाबत शहरावासीयामधून आश्चर्य व्यक्त होत आहे.