Yawatmal murder case :- जुन्या वादातून २३ वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील आंबेडकरनगर पाटीपुरा येथे गुरूवार, १६ ऑक्टोंबरला दुपारी ३.५० वाजता घडली होती.अटकेच्या कारवाईनंतर या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती.रविवारी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतरच्या दरम्यान न्यायालयाने तीनही आरोपींची कारागृहात रवानगी केली.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने केले वार
शहजाद मुज्जफर अली उर्फ बल्ली (२३) रा. रामरहीमनगर, यवतमाळ असे मृतक तरूणाचे नाव आहे. रामरहीमनगर येथील शहजाद मुज्जफर अली उर्फ बुल्ली याच्यावर गुरूवारी दुपारी आंबेडकरनगरात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. या प्रकरणात शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपासचक्रे हलवीत चौकशी सुरु केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी सैयद अमन सैयद आरीफ रा अंबिका नगर यवतमाळ हा घाटंजी येथे लपुन असल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी ईरफान अली उर्फ लेंडी बरकत अली व सैय्यद आरीफ सैय्यद सलीम यांचा गावात शोध घेवुन त्यांना सुध्दा अटक करण्यात आली.
अटकेच्या कारवाईनंतर या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली.त्यानंतरच्या दरम्यान न्यायालयाने तीनही आरोपींची कारागृहात रवानगी केली.




