Yawatmal :- धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ३६६ गावे व पारधी बेड्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या मास्टर ट्रेनरचा कार्यशाळा (workshop)दिनदयाल प्रबोधिनी निळोणा येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेवटच्या आदिवासी व्यक्तीपर्यंत विभागाच्या योजना पोहचावा, असे कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी सांगितले.
धरती आबा अभियानांतर्गत मास्टर ट्रेनरची कार्यशाळा इ आदिवासी विकास मंत्र्यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
कार्यशाळेचे उद्घाटन प्रा.डॉ.उईके यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मिना, सहायक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पुसद आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अभियानात सहभागी विभागांनी शेवटच्या आदिवासी(Adivasi) लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवावा. गावपातळीवरील आवश्यक विकासात्मक आराखडा तयार करुन दिनांक २ ऑक्टोंबर रोजी होणार्या ग्रामसभेत आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. सदर आराखडा प्रथम प्राधान्याने जिल्हाधिकार्यांमार्फत शासनास सादर करावा, असे निर्देश प्रा.डॉ.उईके यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभियानात जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी उत्कृष्ट काम करावे, अशा सूचना केल्या. पांढरकवडा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी योजनेच्या अंमलबजावणी करीता मार्गदर्शन केले. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३६६ गावे व पारधी बेड्यांवर जनजागृती कॅम्प, शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून या कॅम्पमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरीकांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.




 
			 
		

