एक लाख रूपयाचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द
नांदेड (Kishanrao Bhawar) : राज्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत, नांदेड येथील योगशिक्षक आणि सेवानिवृत्त ग्रंथपाल किशन रंगराव भवर (Kishanrao Bhawa यांनी शेतकरी बांधवांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्या एका महिन्याचे पेन्शन, म्हणजेच रु. १,०७,९८५ (एक लाख सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये फक्त) इतकी आर्थिक मदत दिली.
सध्या वामन नगर, नांदेड येथे राहणारे आणि मुंबईच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून सेवानिवृत्त झालेले श्री. भवर (Kishanrao Bhawar) यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Collector Rahul Kardile) यांच्याकडे हा मदतीचा धनादेश सुपूर्द केला. किशन भवर यांचे हे कार्य समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या या योगदानाने समाजातील इतर घटकांनाही मदत करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या या उदात्त कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.