धानोरा येथील स्टेट बँक समोरील घटना
धानोरा (Young Death Case) : दगडावरून दुचाकी घसरून दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ६ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास येथील स्टेट बँक समोर घडली. भगचंद माणिक लीलारे( २८) रा. पठारी, जिल्हा बालाघाट ,छत्तीसगड असे मृतकाचे नाव आहे.
मागील काही महिन्यापासून धानोरा ते चातगांव दरम्यान महामार्गाचे काम सुरु आहे. धानोरा शहरातील रस्ता पूर्णपणे रस्ता खोदून ठेवलेला आहे. आज सुद्धा रस्ता खोदकाम सुरु होते. या (Young Death Case) दरम्यान भागचंद हा श्प्४९ ँभ् ३१ ०६ या क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या घरी जात होता तर मुरूमगावाकडून एमएच ३३ ऊ ४८३४ क्रमांकाची रूग्णवाहीका गडचिरोलीकडे जात होती. अॅम्बुलन्सला खोदलेल्या रस्त्यावरून साईड देताना दुचाकी दगडावरून गेल्याने घसरली व दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागल्याने तो जागीच मरण पावला . त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.
त्याचे वडील व भाईचंद दोघेही बांबू डेपो मध्ये देखरेखीचे काम पाहतात. (Young Death Case) भाईचंदचा विवाह झाला असून त्याला एक वर्षाची मुलगी आहे. या मे महिन्याच्या १८ तारखेला त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवसासाठी गावाकडे जाणार होता. परंतु सुरु असलेल्या महामार्गाच्या कामामुळे भाईचंदचा जीव गेल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.




