कन्हान (Youth committed suicide) : बोरडा (गणेशी) येथिल शुभम खंडाईत या २६ वर्षीय युवकाने घरी एकटाच असल्याची संधी साधुन राहत्या घरी पंख्याच्या लोखंडी कडीला पांढ-या दोरी साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली.
गं.भा. कल्पना अंकुश खंडाईत वय ४५ वर्ष रा. बोरडा या शेत मजुरीचे काम करित असुन त्याना एक मुलगा शुभम व एक मुलगी जिचे लग्न होऊन ती आप ल्या सासरी राहते. गं.भा. कल्पना अकुंश खंडाईत यां चा मुलगा शुभम अकुंश खंडाईत वय २६ वर्ष सोबत राहतो व हातमजुरीचे काम करित होता. तो गेल्या दोन वर्षा पासुन दारुचे व्यसनाच्या आहारी गेल्याने कोणते ही काम धंदा करित नव्हता आणि आई ला दारु पिण्या करिता कधी कधी पैसे मागायचा व ती त्याला पैसे देत होती.
दहा दिवसापुर्वी ती तिच्या भावाच्या, बहीणीच्या व मुलीच्या घरी गेली होती. सोमवार (दि.१४) जुलै ला सकाळी भाची किरण चा फोन आला की, मामी तुम्ही लवकर घरी या शुभम ने घरी पंख्याला गळफास लाव लेला आहे. त्यामुळे ती तात्काळ घरी आली असता शुभम ने घरातील छताच्या पंखा लावण्याच्या लोखंडी कळीला पाढ-या दोरीने फासी लावलेला दिसला. मुला च्या मुत्युस माझा कोणावर शका संशय नाही. अशी कन्हान पोलीस स्टेशन ला आई गं.भा. कल्पना अंकुश खंडाईत हिने तोंडी बयाण दिल्याने कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.