बहिणीची भेट ठरली अखेरची
पालोरा (Youth Man Death) : शेतावर लावलेल्या विद्युतच्या धक्क्याने एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजता दरम्यान मोहाडी तालुक्यातील किसनपूर येथे उघडकीस आली. गंगाधर प्रल्हाद उईके(३२) रा. किसनपूर असे मृतकाचे नाव आहे.
गंगाधर उईके हा आपल्या बहिणीची भेट घेण्याकरीता गेला होता. गंगाधर हा बहिणीची भेट घेऊन तिथून दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वगावाला येण्यासाठी मजबूत रस्ता नसल्यामुळे शेत वाटेने निघाला होता. यावेळी शेतशिवारातून जात असतांना शेत पिकांची वन्यप्राण्यांपासून वाचविण्यासाठी लावलेल्या विद्युत ताराला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. (Youth Man Death) घटनेची माहिती करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांना देण्यात आली.
माहिती मिळताच ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनेचा स्थळ तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती ठाणेदार अमित वानखेडे यांना देण्यात आली. (Youth Man Death) घटनास्थळी तिरोडा पोलीस स्टेशनची चमु दाखल झाली पंचनामा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले. स्वातंत्र्य काळ लोटून ७५ वर्षे झाले तरी मोठा किसनपुर येथे जाण्यासाठी अजूनही मजबूत रस्ता नसल्याने अजूनही येथील कुटुंब मरणयातना सहन करत आहेत, मोठा किसनपुर येथील पाच ते सात कुटुंब हे आदीवासी असून शेतकरी आहेत.
शेतकर्यांनी आपले पिक वन्यप्राणी पासून वाचविण्यासाठी अनधिकृत तार पसरवून जिवंत विद्युत लावला. त्यामुळे गावाकडे येण्यासाठी मजबूत रस्ता नसल्याने शेतशिवारातून येत असतांनी ही (Youth Man Death) दुर्दैवी घटना घडली. मृतकाच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील आहेत. तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गंगाधर प्रल्हाद उईके यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या शेतकर्यांवर पोलीस कारवाई करतील का? अशा प्रश्न निर्माण झाला आहे.