चिखली येथील घटना!
आखाडा बाळापूर (Youth Suicide) : मराठा आरक्षणासाठी होत असलेला उशीर व मराठा आंदोलन (Maratha Movement) दरम्यान दाखल गुन्हे शासनाने मागे घेतले नाही यामुळे मनस्ताप होउन कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील युवकाने विषारी औषध पिउन आत्महत्या केली. सोमवारी उशिरा आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात (Akhara Balapur Police Station) अकस्मात मुत्यू नोंद करण्यात आली आहे.
शेतातील शेडमध्ये कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या!
कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील प्रविण दादाराव चव्हाण वय 34 वर्षे हा सकल मराठा समाज आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात पहिल्या पासून सक्रिय होता. मराठा आंदोलन दरम्यान त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे शासनाने मागे घेतले नसल्ल्याने व मराठा आरक्षणासाठी होत असलेला उशीर सहन होत नसल्याच्या मनस्तापातून 26सप्टेंबर रोजी सकाळी चिखली शिवारातील शेतातील शेडमध्ये कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
याबाबतीत अनिल शिवाजी चव्हाण यांच्या माहीतीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अकस्मात मुत्यूः नोंद करून घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, बिटप्रमुख शेख बाबरभाई, प्रभाकर भोंग पोलीस पथकाने भेट दिली.
यापूर्वी विविध ठिकाणी आत्महत्या घटना!
मराठा समाज आरक्षणासाठी यापूर्वी आखाडा बाळापूर, डोंगरगावपुल, चिखली, शेवाळा, देवजना, कान्हेगाव,पिंपरी, सिंदगी डीग्रस कोंढूर, व इतर ठिकाणी आत्महत्या घटना घडलेल्या आहे.