परभणीच्या जांब शिवारातील शेत आखाड्यावर विषारी द्रव्य केले प्राशन!
परभणी (Youth Suicide) : बारावी परीक्षेत (12th Exam) कमी गुण मिळाल्याने नैराश्यात तरुणाने शेत आखाड्यावर विषारी द्रव प्राशन केले. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात (Treatment Hospital) दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी 19 मे रोजी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कैलास रेंगे यांनी खबर दिली आहे. त्यांचा पुतण्या कृष्णा रेंगे वय 17 वर्ष, याला बारावी परीक्षेत कमी गुण पडले होते. नैराश्यात सदर तरुणाने शेतातील आखाड्यावर विषारी द्रव (Poisonous Liquid) प्राशन केले. ही घटना 10 मे च्या सकाळी 8 वाजता जांब शिवारातील शेत आखाड्यावर घडली. तरुणाला उपचारासाठी (Treatment) परभणी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी दैठणा पोलिसात (Daithana Police) नोंद करण्यात आली असून तपास पोह. मोरे करत आहेत.