शिंदे – ठाकरे गटात मत विभाजनाची शक्यता
कॉंग्रेस व वंचितची अस्तित्वाची लढाई तर भाजपला संधी
मानोरा (Zilla Parishad Election) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली असून निवडणूक आयोगाने प्राथमिक हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात (Zilla Parishad Election) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मानोरा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मानोरा तालुक्यात एकूण 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गण आहेत. आसोला, कोंडोली, तळप, देऊरवाडी, इंझोरी, दापुरा, कुपटा, धामणी, पोहरादेवी, शेंदोना, गिरोली, साखरडोह, फुलऊमरी, भुली, शेंदूरजना आढाव, पाळोदी हे पंचायत समिती गण आहेत. २०२० च्या निवडणुकीत भाजपाने चार जिल्हा परिषद गट आणि नऊ पंचायत समिती गणांवर विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली होती. त्या वेळी पक्ष एकसंघ होता आणि स्थानिक स्तरावर मजबूत संघटन तयार होते. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दोन गटांत विभागली आहे. विद्यमान आमदार सौ सईताई डहाके हया भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यात तर खासदार संजय देशमुख हे उद्धव ठाकरे गटाचे गटाकडून लोकसभेत विजयी झाले आहेत. या विभागणीनंतर पारंपरिक मतदार वर्गात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. (Zilla Parishad Election) मतदार परिवर्तनाच्या मुडमध्ये असुन भाजपाने जुन्यानाच पुन्हा उमेदवारी दिल्यास पराभवाची धूळ चारली जाऊ शकते, राष्ट्रवादी काँग्रेसलाही फुटीचा सामना करावा लागला असून, तालुक्यातील बहुतेक पदाधिकारी अजीत पवार यांच्या गटात गेले आहेत.
शरद पवार गटात तालुक्यात पदाधिकारी उरलेले नाहीत. स्वर्गीय राजेंद्र पाटणी यांचा वर्ग मोठा चाहता वर्ग असूनही त्यांचे चिरंजीवांच्या वर्तुलामागे बदनाम मुन्नीबाई सिटी नसल्यामुळे आता ते कोणती भूमिका घेणार यावर सर्व काही अवलंबून राहणार असून वंचित व काँग्रेस ला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. मागील वेळेस ओबीसी आरक्षणात वंचितच्या सौ. छाया राठोड यांनी परिवर्तनाची दिशा दिली परंतु येथे वंचितचा दमदार चेहरा नसल्याने वंचित येथे तंग धरू शकली नाही . आता सौ राठोड या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याच्या तयारीत दिसत आहे.
केंद्र आणि राज्यात भाजपा सत्तेत असूनही भाजपाला तालुक्यात ठोस ओळख निर्माण करण्यात यश आलेले नाही. संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी अद्याप मतदारांशी मजबूत संपर्क प्रस्थापित झालेला नाही. पक्षातील गटबाजी भाजपासाठी चिंतनाचा विषय आहे. एकेकाळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या काँग्रेसची ताकदही गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.
याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदे सेना जलसंधारण मंत्री संजय राठोड व माजी खासदार तथा विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर असल्याने गिरोली, धामणी व गलमगावच्या व्यतिरिक्त शिंदे सेना दिसत नाही, परंतु त्यांच्याकडेही उमेदवाराची मागणी वाढणार आहे. बहुजन मुक्ती पार्टी, मनसे, प्रहार संघटना आणि वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षांनीही या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मत विभाजन मोठ्या प्रमाणात होणार असून निकालावर त्याचा थेट परिणाम दिसू शकतो. (Zilla Parishad Election) सध्या सर्वच पक्षांनी आपल्या गोटात बैठका, प्रचार आराखडे आणि स्थानिक नेत्यांच्या संपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची नावेही चर्चेत आली आहेत. निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आणि मतदान केंद्रांची पाहणी करण्याचे काम सुरू केले असून, काही महिन्याभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात मानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत चुरशीच्या होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे.