गरजू , निराधार व वृद्धांना केले दिवाळी फराळाचे वाटप!
मानोरा (Zilla Parishad) : मानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गोस्ता येथील जि. प. वरि. प्राथ. शाळा गोस्ता येथील विद्यार्थ्यांकडून गावातली गरजू, निराधार व वृद्ध व्यक्तींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. “व्यक्तीच्या जडणघडणीत समाजाचा मोठा वाटा असून तो समाजाचं देणं लागतो” या जाणिवेतून जि.प.वरि.प्राथ.शाळा गोस्ता या शाळेतील मुख्याध्यापक श्री.विवेक कुलकर्णी यांनी मुलांना यावर्षीची दिवाळी फटाके न फोडता साध्या पद्धतीने दिवे व पणत्या लाऊन साजरी करण्याचे सांगितले व फटाक्यासाठी मिळालेल्या पैशातून गावातील गरजू, निराधार व वृद्धांना दिवाळीचा फराळ वाटप करण्याचे आवाहन केले. या आवाहणाला मुलांनी प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने निधी जमा केला.
फटाक्यासाठी मिळालेल्या रकमेतून मुलांनी जमवला निधी!
शिक्षकांच्या (Teachers) मदतीने चिवडा व इतर फराळ बनवून गावातील गरजू वृद्धांना त्याचे वाटप केले. यंदाच्या अतिवृष्टी व नापिकीने ग्रासलेल्या गोरगरीब अनाथ वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. शाळेच्या या उपक्रमाचे शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.मनोहर पवार व इतर सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी कौतुक करत शाळेतील सर्व शिक्षकांचे व मुलांचे अभिनंदन करून शाळेची वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
यंदाची दिवाळी फटाके न फोडता दिवे व पणत्या लावून साजरी करणार मुले!
गरजूंना फराळ वाटप या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यवाही शाळेतील उपक्रमशिल व होतकरू शिक्षक सुनिल चव्हाण, श्री.प्रदीप ढगे व श्री.सतीश जाधव, प्रशिक्षणार्थी शितल ढगे, स्वयंसेवक अक्रम पठाण यांनी मुख्याध्यापक यांच्या समवेत पार पाडत या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली.
उपक्रम राबवल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
गोस्ता शाळा हि उपक्रमशील शाळा म्हणून पुढे आलेली शाळा आहे. सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्या फराळ वाटपाच्या कार्यक्रमातून दिसतो व अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये (Students) सामाजिक मूल्यांची उत्तमप्रकारे रुजवणूक होते. हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
अनिल पवार, गटशिक्षणाधिकारी मानोरा