आळंदा ग्राममंडळाचा ऐतिहासिक निर्णय
बार्शीटाकळी (ZP Primary School) : देशाच्या संरक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिक तथा आळंदा ग्राम मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील ढोरे यांनी गावातील (ZP Primary School) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पाणी व घरकर माफगकरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा ग्राम मंडळाच्या दि. 26 मे ला झालेल्या बैठकीत, आळंदा गावातील जे विद्यार्थी (ZP Primary School) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये सन 2025- 26 या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला किंवा घेतील, त्यांचे पालकांना ग्राम मंडळाकडून घेतला जाणारा पाणी आणि घरपट्टी कर माफ करण्यात येणार असल्याचे ग्राम मंडळाचे अध्यक्ष तथासरपंच दत्ता ढोरे व ग्राम मंडळाच्या सदस्यांनीयांनी हा निर्णय घेतला आहे.
गावातील जिल्हा परिषद (ZP Primary School) शाळेची गुणवत्ता, व्यवस्थापन, कामकाज पाहून घेतला असल्याचे सांगितले. गावकऱ्यांमध्ये शाळेविषयी जाणीव निर्माण करणे, प्राथमिक शिक्षणातील मातृभाषा मराठीचे महत्त्व समजून देणे, गावात शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे ,अशा अनेक हेतूने हा निर्णय ग्राम मंडळांने घेतला आहे. गावची शाळा अग्रेसर असण्यामागे मनोज जयस्वाल या शिक्षकांचासिंहाचा वाटा आहे ,असे मत दत्ता ढोरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या (ZP Primary School) प्राथमिक शाळेचे महत्त्व लक्षात घेऊन असा निर्णय घेण्यासाठी उपसरपंच विश्वनाथभाऊ जानोरकर, ग्राम मंडळ सदस्य दयारामभाऊ खाडे, ज्ञानेश्वरभाऊ सुलताने, सागर मोहोड, सुरेखा ताई बेद्रे, सोनालीताई नवलकार तसेच ग्रामविकास अधिकारी स्वातीताई उंबरकर यांनी मोलाची साथ दिली. या निर्णयामुळे गावात शैक्षणिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील लोक या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा या शाळेच्या शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी ग्राम मंडळाचे अभिनंदन केले .
गावातील विद्यार्थ्यांना (ZP Primary School) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील शाळेतील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा परिषद (ZP Primary School) प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे. या चांगल्या उद्देशाने गावातील जनताव गाम मंडळातील सदस्यांच्या विचारातून सदर निर्णय घेतला, असे दता ढोरेनी व्यक्त केले.




 
			

