देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: तर, बाल सुसंस्कार शिबिरांची गरजच काय?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > लेख > तर, बाल सुसंस्कार शिबिरांची गरजच काय?
संपादकीयलेख

तर, बाल सुसंस्कार शिबिरांची गरजच काय?

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/14 at 6:50 PM
By Deshonnati Digital Published May 14, 2024
Share

जी गोष्ट घरातूनच शिकवून, रुजवून केल्या गेली पाहिजे, ते सुसंस्कार घरा-घरात प्रत्यक्ष दिसतच नाही, किंबहुना शिल्लकच राहिले नाही, ते सर्व संस्कार आता बाहेरुन मग ते बाजारातून असो वा सेवाकार्यातून, धर्मकार्यातून मुलांवर व्हावेत, अशी अपेक्षा पालक करीत आहेत. जे कुटुंब हिताचेच नव्हे तर समाज व राष्ट्रहिताचे पण आहेत ते संस्कार मुलांनी रोज पालकांना पाहून स्वत:मध्ये रुजविले पाहिजेत, मात्र कुटुंबात मुलांना काय आवश्यक आहे ते न देता, मुलांची काय इच्छा व मागणी आहे, ते देऊन फक्त ‘लाड’ पुरविण्याचे कार्य केले जाते, आणि येथेच संस्कार संपतात.

 

अच्छे संस्कार किसी मॉल से नही,
परिवार के माहौल से मिलते हैं।
यावर्षी उन्हाळ्यात राज्यभरात बाल सुसंस्कार शिबिरांचे आयोजन खूप मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे अनुषंगाने विदर्भात व त्यातही प्रामुख्याने वर्‍हाडात ६० ठिकाणी यंदा बाल सुसंस्कार शिबिरे घेण्यात येत आहेत. तर वारकरी बाल शिबिर व इतरही बाल सुसंस्कार शिबिरे तसेच ब्रह्माकुमारीज्चे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर अशा वेगवेगळ्या शेकडो बाल सुसंस्कार निशुल्क शिबिरात हजारो लहान मुले सहभागी झाली आहेत. आयोजक, दानदाते, सहकार्यकर्ते, कार्यकर्ते व पालक या सर्वांचे भरपूर सहकार्य अशा शिबिरात होत असते, ही कौतुकाची बाब आहे.

बाल संस्कार शिबिरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार होतील, मोबाईलपासून व व्यसनांपासून विद्यार्थी दूर राहतील, भारतीय संस्कृती, परंपरा व आध्यात्मची ओळख होईल. आजचे विद्यार्थी उद्याचे चांगले नागरिक होतील, वगैरे अनेक विचार या शिबिराला चालविणार्‍या व भेट देणार्‍यांनी व्यक्त केले आहेत. तर या शिबिरातून सत्य, अहिंसा, इमानदारी, मोठ्यांचा आदर, साधी राहणी व उच्च विचारसरणी, नम्रता, प्रेम, शांती, आदी शाश्वत नीतीमुल्यांची पायाभरणी होईल, असा विश्वासही सर्वांना आहे. त्यामुळेच अशा शिबिरांचे समर्थन व आयोजन केले जात आहे. मात्र मुळातच हे सर्व संस्कार शिबिरातूनच का व्हावे? घरा-घरातून का होऊ नये? याचा फारसा विचार कोणी करत नाही. प्रत्यक्षात जी गोष्ट घरातूनच शिकवून, रुजवून केल्या गेली पाहिजे, ते सुसंस्कार घरा-घरात प्रत्यक्ष दिसतच नाही, किंबहुना शिल्लकच राहिले नाही, ते सर्व संस्कार आता बाहेरुन मग ते बाजारातून असो वा सेवाकार्यातून, धर्मकार्यातून मुलांवर व्हावेत, अशी अपेक्षा पालक करीत आहेत.

जे कुटुंब हिताचेच नव्हे तर समाज व राष्ट्रहिताचे पण आहेत ते संस्कार मुलांनी रोज पालकांना पाहून स्वत:मध्ये रुजविले पाहिजेत. मात्र कुटुंबात मुलांना काय आवश्यक आहे ते न देता, मुलांची काय इच्छा व मागणी आहे, ते देऊन फक्त ‘लाड’ पुरविण्याचे कार्य केले जाते, आणि येथेच संस्कार संपतात आणि कुसंस्कारांना चालना मिळते, हे पालकांना कळत नाही, असे नाहीच. मात्र ‘आमचा नाईलाज आहे,’ असे पालक सांगतात. उलट संस्काराचे, मुले चांगले घडविण्याचे काम शाळेतील पगारी शिक्षकांनी करावे, ते त्यांचेच काम आहे, असे बोलून मोकळे होतात. वास्तविक मुलांचे झाले की, अशा पालकांचेही सुसंस्कार शिबिरे झाली पाहिजेत, असे वाटते. त्यातून पालकांच्या जबाबदारी व कर्तव्याचे धडे दिले पाहिजेत. त्याशिवाय कितीही बाल सुसंस्कार शिबिरे झालीत तरी फारसा सकारात्मक परिणाम समाजात दिसणार नाही. अनेक बाल संस्कार शिबिरात राजकीय नेत्यांना व इतर प्रतिष्ठितांना बोलाविण्यात येते. त्यांच्या भेटीच्या बातम्याही फोटोसह दिल्या जातात. ते मुलांना चार चांगल्या गोष्टी सांगतात, मार्गदर्शनही करतात. प्रत्यक्षात त्यांचा राजकीय व्यवहारात सुसंस्काराशी संबंधच काय असतो? आज सुसंस्काराने राजकारण व इतर व्यवसाय चालत आहेत काय? प्रतिष्ठितांचे बोलणे व प्रत्यक्ष वागण्यात किती फरक आहे. निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांना पैसे, दारु व पार्ट्या देणारे राजकारणी काय संस्कार करणार?

दुसरीकडे समाजात अवैध व्यवसाय, दारु, गुटखा, बेईमानी, फसवणूक, जातीयवाद, धर्मवाद, हाणामारी वगैरे दिवसेंदिवस वाढत आहे. राजकारण्यांनी, अधिकार्‍यांनी व इतर प्रतिष्ठितांनी हे सर्व वाढवावे, यात भर घालावा आणि लहान मुलांना सुसंस्कार देण्याची बतावणी करावी, हे सर्व विरोधाभासी आहे. प्रत्यक्षात मोठ्यांकडे पाहूनच मुले जास्त शिकतात, तेव्हा त्यांचे समोर आई-वडील, कुटुंबीय व गुरुजी हेच प्रथम संस्कार करणारे खरे आदर्श असतात, हे विसरुन चालणार नाही. सद्यस्थितीत समाजात सर्व काही बिघडले आहे, तेथे आपण एकटे काय करणार?
असे विचारण्यापेक्षा आपणच चांगल्याची सुरुवात करणे, हे महत्त्वाचे आहे. सुसंस्कार बाल शिबिरात जाऊन शिकून आलेल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी व विचारांना सतत तेवत ठेवण्याचे कार्य पालकांना व कुटुंबियांना करावे लागेल, तरच शिबिराचा हेतू साध्य होईल. एवढे मात्र खरे!
शेवटी घरा-घरातूनच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, नाहीतर मुलांवर दुष्परिणाम होणारच, या आशयाच्या ओळी आठवतात…
जिस गांव में बारिश ना हो,
वहां की फसलें खराब हो जाती है,
जिस घर में शिक्षा और संस्कार ना हो,
तो वहां की नस्ले खराब हो जाती हैं।

राजेश राजोरे
९८२२५९३९०३
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या
बुलढाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)
खामग्ााव, जि. बुलढाणा

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
SDO vehicle Accident
विदर्भभंडारा

SDO vehicle Accident: कारवाईसाठी गेलेल्या एसडीओचे वाहन उलटले…

Deshonnati Digital Deshonnati Digital October 10, 2025
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण रॅली
Maharashtra Elections 2024: एमव्हीएमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होत नाही..! नाना पटोले यांनी सांगितली पद्धत
Parbhani : मद्यधुंद तरूणाने पोलिसांच्या वाहनाची फोडली काच
Bomb Threat Case: नांदगाव पेठ येथे पाकिस्तानहून धमकीचा कॉल, दिल्लीला बॉम्बस्फोटाची धमकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?