देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: निर्यातक्षम भेंडीचे विविध वाण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > बिझनेस > शेती(बाजारभाव) > निर्यातक्षम भेंडीचे विविध वाण
शेती(बाजारभाव)

निर्यातक्षम भेंडीचे विविध वाण

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 12:08 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

निर्यातक्षम भेंडीचे निकष:- निर्याक्षम भेंडी असण्यासाठी फळे कोवळी, गर्द हिरव्या रंगाची, दिसायला आकर्षक व लुसलुशीत असावीत. फळांची लांबी ७.५ ते १० सें.मी. एवढी लांब, सरळ व पाचधारी असावीत. फळांची टोके निमुळती, टवटवीत व देठासह असावीत. फळावर लव (केसासारखे मऊ काटे) असू नयेत. फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत सरळ असावा. फळे निरोगी असावीत. तसेच कीटकनाशकांचे व बुरशीनाशकांचे रासायनिक अवशेष शिल्लक नसावेत.
वाण:– भेंडीच्या अर्का अनामिका, फुले विमुक्ता, परभणी क्रांती, अर्का अभय, या सुधारित जाती तर संकरित जातींमधील महाबीज ९१३ (तर्जनी), फुले कीर्ती या जाती निर्यातक्षम भेंडीसाठी योग्य आहेत.
अर्का अनामिका- आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसित झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.

२) परभणी क्रांती- फळे व ८ ते १० सेंमी. लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.

३) अर्का अभय- अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.

४) पुसा सावनी– ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसित झाली असून फळे १० ते १५ सेंमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.

संकरित भेंडी-१) महाबीज ९१३ (तर्जनी) – या जातीची भेंडी ४५ ते ४६ दिवसात तोडणीला येत असून पिकाचा कालावधी १०० ते ११० दिवस आहे. फळे मध्यम लांब (१० ते १२ सेमी) असून सर्वसाधारणपणे एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळते.
२) फुले किर्ती- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वाणाची शिफारस केली आहे. फळे हिरव्या रंगाची असून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये लागवडीसाठी योग्य जात आहे. ही जात केवडा रोगास प्रतिकारक्षम आहे.
बियाण्याची निवड व बियाणे उपचार: विषाणूला प्रतिकारक, फळाला व देठाला हिरवा रंग असणारी, फळे पाचधारी असणारी, रोग व किडींना प्रतिकारक्षम, चांगले उत्पन्न देणारी अशा जातीच्या बियाण्याची निवड करावी. बियाण्याची निवड केल्यानंतर बियाण्याची टोकणी किंवा पेरणी करण्यापूर्वी २४ तास साध्या पाण्यात किंवा क्लोरमेक्वॅट क्लोराईड १०० पीपीएम (१० मिलीग्रॅम १ लिटर पाण्यात) द्रावणात किंवा ५० पीपीएम जीबेरेलिक अ‍ॅसिड द्रावणात भिजत ठेवल्यास रोपे लवकर उगवून येतात व जोमदार वाढ होते. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.

 

गजानन तुपकर
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)
कृषी विज्ञान केंद्र, अकोला

You Might Also Like

Arni : सोयाबीन ३ हजार ५०० रुपये क्विंटल अन् सोयाबीन तेल १४० रुपये किलो !

Gadchiroli : जिल्ह्यातील ५३२६ शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Wardha : सोयाबीनला ७५० रुपये क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसव

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Ghatanji : सातबारा कोरा करा, शेतकर्‍यांना दिलासा द्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Chhatrapati Shivaji Maharaj
विदर्भवाशिम

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराने होते ‘नागरिकांच्या हमश्यांचे निराकरण

Deshonnati Digital Deshonnati Digital August 5, 2025
Buldhana: जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ; आरोपी कडून ट्रॅक्टरसह मोटार सायकलही हस्तगत 
Pusad heavy rain: धुवाधार पावसाने रस्त्यासह दुकानात पाणीच पाणी
Wardha Ladki Bahin Yojana : जिल्ह्यातील १०९ लाडक्या बहिणींनी सोडला योजनेचा लाभ
Ganesh Festival: गौरीला निरोप, बाप्पांचे जल्लोषात आगमन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

यवतमाळविदर्भशेती(बाजारभाव)

Arni : सोयाबीन ३ हजार ५०० रुपये क्विंटल अन् सोयाबीन तेल १४० रुपये किलो !

October 20, 2025
विदर्भगडचिरोलीशेती(बाजारभाव)

Gadchiroli : जिल्ह्यातील ५३२६ शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

October 20, 2025
विदर्भवर्धाशेती(बाजारभाव)

Wardha : सोयाबीनला ७५० रुपये क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसव

October 20, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?