देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: महाराष्ट्राचा विवेक…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > अग्रलेख > महाराष्ट्राचा विवेक…!
अग्रलेख

महाराष्ट्राचा विवेक…!

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/05 at 12:11 PM
By Deshonnati Digital Published June 5, 2024
Share

 

मागच्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ४० पेक्षा अधिक जागा जिंकणार्‍या भाजप आघाडीला यावेळी प्रचंड मोठा धक्का सहन करावा लागला. भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आणि भाजपने जोडलेल्या दोन नव्या मित्र पक्षांनाही कोणतीही भरीव कामगिरी करता आली नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत जे काही राजकारण भाजपने केले त्याची चीड मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केली. सूडाच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या विवेकी मतदारांनी धडा शिकविल्याचे या निकालातून दिसून येते. तीन केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीने असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोणती यावर अगदी मतदारांनी आपले निर्णायक मत दिले असेही म्हणता येईल. अर्थात दोन्ही शिवसेनेत तसा मोठा फरक नाही. शिंदे गटाने या निवडणुकीत १५ जागा लढविल्या होत्या आणि त्यांचे सात उमेदवार विजयी झाले, तर २३ जागा लढविणार्‍या ठाकरे गटाला नऊ जागा मिळाल्या, परंतु ठाकरे गटाने मुंबई या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व कायम राखले.

ठाणे आणि कल्याण शिंदे गटाने जिंकत आपले अस्तित्व ठामपणे दाखवून दिले असेही म्हणता येईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मात्र कौल अगदी स्पष्ट होता. अजित पवारांनी हट्टाने लढविलेली बारामतीची जागा शरद पवार गटाने मोठ्या मताधिक्क्याने जिंकत अजित पवारांच्या पक्ष सोडण्याचा निर्णय बारामतीकरांना मान्य नसल्याचेच दाखवून दिले. अजित पवार गटाची लाज राखण्यात तटकरेंना यश आले. काँग्रेसने मोठी उडी मारत राज्यात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. या पुढच्या राजकारणात राज्यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहू शकतो. पुढच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अधिक उत्साहाने, ताकदीने मैदानात उतरेल आणि जनमताचा कौल असाच कायम राहिला तर कदाचित राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते.एकूणच महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या विवेकाने राजकारण्यांच्या विवेकाला साद घातली असे म्हणावयास हरकत नाही.

You Might Also Like

पहिला अडथळा पार….?

केंद्रात महाराष्ट्र……!

आव्हान त्यांच्यासमोरही….!

आता खरी कसोटी….!

जोर का धक्का …..!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nanded Municipal Corporation
नांदेडमराठवाडा

Nanded Municipal Corporation: नांदेड शहरात उद्भवलेल्या पुर परिस्थितीत महापालिकेने केल्या उपाययोजना!

Deshonnati Digital Deshonnati Digital September 24, 2025
Congress government: कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची मराठी संमेलनावर बंदी; इंडिया आघाडीला आणखी एक आव्हान!
Umred MLA: उमरेडचा आमदार बसपाचाच: प्रदेशाध्यक्ष एड. सुनील डोंगरे
Gadchiroli : ग्राहकांच्या विश्वासामुळेच पतसंस्थेची प्रगती  
Hingoli Ganeshotsav: हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गणेशोत्सवात जोपासली सामाजिक बांधिलकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

अग्रलेख

पहिला अडथळा पार….?

June 10, 2024
अग्रलेखदेशराजकारण

केंद्रात महाराष्ट्र……!

June 10, 2024
अग्रलेख

आव्हान त्यांच्यासमोरही….!

June 7, 2024
अग्रलेख

आता खरी कसोटी….!

June 7, 2024
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?