पुरुषोत्तम गावंडे
संसदीय लोकशाहीत जोपर्यंत सरकार प्रमुख हा थेट लोकांकडून नव्हे तर, अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधीकडून निवडला जातो तोपर्यंत, एका राष्ट्रीय जनादेशाने लोकशाही सरकार बनले म्हणणे जरा धारिष्ट्याचे आहे! असो, आपण लोकप्रतिनिधींची इच्छा हीच जनतेची इच्छा आहे असे समजले तरी, यावेळी लोकांना काय अभिप्रेत होते हे कळणे दुरापास्तच म्हटले पाहिजे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने दिलेल्या कौलाचा अर्थ लावणे जनतेने अवघड करून ठेवले आहे! ‘जिगसॉ’ पझल नावाचा एक लहान मुलांचा पझल गेम असतो. त्यात अनेक तुकडे जोडून एक चित्र तयार करायचे असते. देशाच्या लोकसभा निवडणुकीतही थोडेफार असेच असते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघ हा एक छोटासा तुकडा असतो आणि त्या तुकड्याला संपूर्ण चित्र कसे होईल हे मुळीच माहीत नसते; परंतु अनेक तुकडे एकत्र जोडले गेल्यानंतर मात्र एक चित्र तयार होते आणि गंमत म्हणजे प्रत्येक तुकड्याला तेच चित्र तयार करायचे होते किंवा ते चित्रच अभिप्रेत होते, असे गृहीत धरले जाते! खरे तर असे गृहीत धरणे चुकीचे आहे, कारण खासदार हा त्या त्या मतदारसंघातील स्थानिक प्रश्नाच्या आधारावर निवडल्या जातो. लोकसभा मतदारसंघाचे स्वतःचे असे प्रश्न असतात, स्वतःची अशी गणिते असतात, वेगळी सूत्रे, वेगळी समीकरणे, वेगळी मर्मस्थळे आणि या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराचा आपला स्वतंत्र थोडाफार करिष्मा असतो. म्हणूनच एखादा उमेदवार ४/५ वेळा भूमिका बदलतो तरीही सतत निवडून मात्र येतोच येतो!
संसदीय लोकशाहीत जोपर्यंत सरकार प्रमुख हा थेट लोकांकडून नव्हे तर, अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधीकडून निवडला जातो तोपर्यंत, एका राष्ट्रीय जनादेशाने लोकशाही सरकार बनले म्हणणे जरा धारिष्ट्याचे आहे! असो, आपण लोकप्रतिनिधींची इच्छा हीच जनतेची इच्छा आहे असे समजले तरी, यावेळी लोकांना काय अभिप्रेत होते हे कळणे दुरापास्तच म्हटले पाहिजे. आता एक-एक ‘जनादेश’ गृहीत धरून तो लोकांना अभिप्रेत आहे काय हे पाहू.
(१) जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून कौल दिला काय?
उत्तर:- याचे उत्तर,-नाही!
स्वतः नरेंद्र मोदी वाराणसी या पवित्र व धार्मिक क्षेत्र असलेल्या जागेवर उभे होते, त्यांनी सतत धार्मिक मिरवणुका, पूजा, आरत्या व स्वत:वर फुलांची उधळण करून, कपाळावर चंदन लेपून (आणि तेवढ्यावरच न थांबता सतत कॅमेरा सोबत ठेवून ते आपल्याच अडाणी अंबानी चॅनेलमार्फत लोकांना दिवसरात्र दाखवले व) त्याद्वारे वातावरण बनवले होते!
अनेक मोठे लोक ठाण मांडून बसवले, निवडणुकीचा प्रचार बंद झाल्यावर (हुशारीने) ध्यान धारणा करतानाचे फोटो असंख्य कॅमेरे लाऊन दिवसभर दाखवले. तरीही हे महाशय, पहिल्या २/३ फेर्यांमध्ये हजारो मतांनी पिछाडले आणि शेवटी निवडून आले.
१८/२० लाखांच्या मतदारसंघात अनेक युत्तäया करून अवघ्या दीड लाखाने येणे तथाकथित ‘विश्वगुरु’ला शोभणारे नव्हते. अनेक उमेदवार १० लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने आले आणि हे ‘दैवी पुरुष’ फक्त दीड लाख आधिक्य घेऊन आले, शेजारी राहुलजींनी मोदींपेक्षा जवळजवळ दीडपट मताधिक्य तर घेतलेच पण- मोदींचे मताधिक्य स्मृती इराणीला पाडणार्या राहुल गांधींच्या पीए पेक्षाही कमी झाले!
शिवाय, ज्यांनी ‘रामलल्ला को लाये है’ असे त्यांचे समर्थक म्हणतात त्या अयोध्येतच मोदींचा माणूस रामाने पराभूत केला! एवढे कमी की काय, म्हणून ते ज्या राज्यातून उभे होते त्या उत्तर प्रदेशात ८० पैकी ८० च्या गमजा मारणारे, ४० सोडा ३५ जागासुद्धा आणू शकले नाहीत आणि (राष्ट्रीय नव्हे तर, जागतिक पक्ष म्हणवून घेणारे) छोट्याशा प्रादेशिक अशा समाजवादी पक्षापेक्षाही मागे पडले! मोदींना यूपीत अखिलेशपेक्षा ४ जागा कमी मिळाल्या मग सांगा लोकांनी मोदींना नाकारले की नाही?
(२) लोकांनी भाजपाला स्वीकारले काय?
उत्तर:- भाजपाचा ४०० पार चा नारा होता, ते तर सोडाच, ३०० किंवा गेलाबाजार २५० पर्यंतही यांना जाऊ दिले नाही, याचा अर्थ जनतेने भाजपाला सपशेल नाकारले आहे.
(३) लोकांची काँग्रेसबाबत काय भूमिका?
उत्तर:- जनतेने काँग्रेसला १०० चा आकडाही गाठू दिला नाही. डबल डिजिट ९९ वर रोखले!
म्हणजे जनतेने काँग्रेसलाही स्पष्टपणे नाकारले आहेच!
एकूण विचार केला तर जनतेने जवळपास सर्वच पक्षांना अधांतरी ठेवले.
लोकांनी दिलेल्या पैकी, बरेचसे कौल अनाकलनीय आहेत!
ते खालीलप्रमाणे:-
(१) मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व, तर गुजरातला (१सोडून) सर्व जागा भाजपाने जिंकल्या!
मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह आणि सुमित्रा महाजन यांना गुंडाळून बाजूला ठेवण्यात आले, गुजरातला सुरत व गांधीनगर इथे, तर मध्य प्रदेशात उज्जैनला बळाचा वापर करून अविरोध निवडणुका झाल्या.
हे सर्व होऊनही जनतेने उदारमनाने माफ केले! या गोष्टींचा जनतेला राग न येणे लोकशाहीसाठी घातक आहे व म्हणूनच ही गोष्ट खरोखर अनाकलनीय आहे.
(२) शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात, दिल्लीत अव्वल काम करणार्या ‘आप’ला दिल्लीकरांनी का नाकारले?
हे अनाकलनीय आहे!
(३) पलटूराम अशी प्रतिमा झालेल्या नितीशकुमार यांना बिहारमध्ये सर्वोच्च स्थानी ठेवण्याचे कारण समजण्यापलीकडचे आहे.
(४) नितीश आणि चंद्राबाबू हे ज्या पद्धतीने सतत भूमिका बदलतात ते सरड्यालाही चिंतेत टाकणारे आहे! तरीही जनतेने छान निवडून देशाच्या चाव्या त्या दोघांच्याच कमरेला बांधल्या.
हे समजणे अवघड आहे!
याशिवाय काही निकाल, ‘व्यवस्थित न्याय केला’ किंवा, आजकालच्या तरुणांच्या भाषेत ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, असे आहेत
ते खालीलप्रमाणे:-
(१) चुलत्याने २५ वर्षे खुर्चीच्या खालीच उतरू न दिलेल्या आणि तरीही त्याला ‘म्हातार्याचं वय झालं’ म्हणणार्या उर्मट पुतण्याची
छान जिरवली!
(२) ‘मी पुन्हा येईन’ असे जो म्हणत होता त्याला ‘मी जाईन’ म्हणायला लावले!
(३) घटनेच्या दहाव्या परिशिष्टाला दुर्लक्षून (जनता मूर्ख आहे हे गृहीत धरून-) ज्या ज्या, घटनात्मक संस्थांनी कालापव्यय/ टाळाटाळ केली (व मुद्दाम करू दिली) त्यांना जनतेने ‘खरे मूळ पक्ष’ कोणते ते कान धरून शिकवले!
(४) उपकारकर्त्या मैत्रिणीचा नवरा पळवणार्या अहंकारी स्मृती ईराणीचा एका साध्या पी.ए.कडून हिशेब पूर्ण केला.
(५) खेळाडू महिलांना छळणारा ब्रिजभूषण, शेतकर्यांना चिरडणारा मिश्रा, शेतकर्यांना ‘साले’ म्हणणारा आणि उगीच कोणाच्याही घरासमोर जाऊन ”हे हे स्तोत्र म्हण!!” असा अजब हट्ट धरणारी नवनीत राणा, या सर्वांना जनतेने बरोबर घरी बसवले!
….एवढे सारे झाल्यावर आता, परम आदरणीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार! (ज्यांना निवडायच्या समितीतून परम आदरणीय मोदींनी, सरन्यायाधीशांना काढून, त्याऐवजी आपलाच एक विश्वासू मंत्री नेमून, ज्यांची निवड सूकर केली तेच हे राजीव कुमार!) व ज्यांनी ११ दिवस डाटा दाबून ठेवण्याचे राष्ट्रीय रेकॉर्ड निर्माण केले, विरोधी पक्षांनी मोदींविरुद्ध केलेल्या १७ तक्रारींची दखलच घेतली नाही, आणि मोदींनी केलेल्या भाषणाबद्दल नड्डांना नोटीस बजावण्याचा अजबच प्रकार करून एक जागतिक पराक्रम केला, व पावणेदोन कोटी मते का वाढवली? याचे सर्व जनतेचा संशय फिटेल असे उत्तर दिलेच नाही!- त्या महापराक्रमी महापुरुषाला ‘भारतरत्न’ देऊन लोकसभा निवडणूक पर्वाची सांगता करावी! एवढीच अपेक्षा!
(बाकी, भारताचा नागरिक म्हणून सर्व काही भरून पावलो! जयहिंद)
७९७७१६३७७४