कुटुंबियांवर तुमसर पोलीसात गुन्हा दाखल
तुमसर (Young Girl Suicide) : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना २२ जुलै रोजी समोर आली. सदर घटनेने तुमसरसह नागपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तरुणासह त्याच्या कुटुंबातील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तुमसर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, (Young Girl Suicide) घटनेतील काही गंभीर मुद्दे अजूनही अनुत्तरित राहिल्याने कायदेशीर चर्चेला उधाण आले आहे.सदर प्रकरणी प्रिंस मेश्राम (२२), भजनलाल मेश्राम (४८) व एक ४० वर्षीय महीला तिन्ही रा. तुमसर असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी मृतक युवतीच्या बहिणीने तुमसर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मृतक तरुणी आणि आरोपी तरुण यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र, लग्नाचे वचन देऊनही तिला आरोपीच्या घरी बोलावून घेतले आणि नंतर घरात प्रवेश नाकारल्यामुळे अपमानित झालेल्या (Young Girl Suicide) तरुणीने विष प्राशन करून गांधीसागर तलावात उडी मारून जीवन संपविले. घटनेनंतर अजनी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता.
पुढे प्रकरणाचा तपास तुमसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेत काही प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. दोन वर्षे परस्पर सहमतीने सुरू असलेले प्रेमसंबंध अचानक फसवणुकीत कसे बदलले? जर दोघांनी परस्पर सहमतीने शारीरिक संबंध (Young Girl Suicide) ठेवले असतील, तर कायद्याच्या चौकटीत गुन्हा सिद्ध होणे कितपत शक्य आहे? लग्नासाठी दिलेली फसवी हमी, घरातून हाकलणे आणि आत्महत्येतील कारण परिणामाचे नाते हे तपासात महत्वाचे ठरणार आहे.
घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चर्चेला उधाण आले असून, केवळ (Young Girl Suicide) प्रेमभंगातून झालेल्या आत्महत्येत कुटुंबीयांवर गुन्हा दाखल होणे कितपत न्याय्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकरणांत अनेकदा सत्य परिस्थिती धूसर राहिल्याने आरोपींना नाहक तुरुंगवास भोगावा लागतो, अशी भावना व्यक्त होत आहे.दरम्यान, मृतक युवतीच वारंवार लग्नासाठी दबाव आणत होती, अशी चर्चाही गावात सुरू आहे. त्यामुळे या कोनातूनही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेमका कोणत्या दिशेने वळतो आणि ‘सहमती’चा मुद्दा काय वळण घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.