खासदार बर्वे यांच्या प्रयत्नांमुळे डीपीसी बैठकीत निर्णय
कन्हान (Kanhan cremation ground) : खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रयत्नां मुळे १८ ऑगस्ट रोजी झालेल्या डीपीसी बैठकीत कन्हान नगरपरिषदेच्या अंतर्गत असलेल्या स्मशान भूमीचा वर्षानुवर्षे जुना व महत्वाचा प्रश्न सोडविण्यात मान्यता मिळाली. बैठकीत स्मशान भूमीसाठी जमीन संपादित करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये आणि सुशोभीकरणासाठी वाटेल तितका निधी उपलब्ध करू न देण्यास आश्वस्थ केले.
कन्हान नगरपरिषदे अंतर्गत पूर्णपणे सुसज्ज स्मशान घाटाकरिता भूमी नसल्यामुळे कामठी परिसरा तील (Kanhan cremation ground) कन्हान नदीच्या काठावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावें लागत होते. उन्हाळयात, पावसाळ्यात देखिल मृतदेहांवर अंत्य संस्कार करताना अनेक अडचणीचा नागरिकाना सामना करावा लागत असल्याने नगरपरि षद अस्तित्वात आल्यापासुन गेल्या १० वर्षात स्मशान भूमीचा प्रश्न अनेक वेळा स्थानिकां कडून उपस्थित करण्यात आला. नगरपरिषद प्रशासनाने स्मशान भूमी करिता अनेक प्रस्ताव पाठवले मात्र ते मंजुर झाले नाही.
याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्मशान भूमीसाठी (Kanhan cremation ground) जागा उपलब्ध नसणे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार बर्वे यांनी निवडुन आल्यास कोणत्याही किंमतीत कन्हान स्मशान भूमीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. निवडुन येताच त्यां नी नगरपरिषदेत बैठक घेऊन स्मशानभूमीसाठी नवीन प्रस्ताव पाठवुन तो लवकरच मंजुर करण्याचे आश्वास न दिले होते. कन्हान नगरपरिषदेत जमिन उपलब्ध ते बाबत एकमत नसल्याने आणि तांत्रिक कारणांमुळे प्रस्ताव पारित होत नव्हता. अश्यात सुसज्ज स्मशान भूमीसाठी जमीन हा सर्वात मोठा अडथळा होता.खास दार बर्वे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जमीन निश्चित करण्याचे आणि पुन्हा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.
कन्हान नगरपरिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व नगरसेवकांनी, नगराध्यक्षा व उपाध्यक्ष आणि नगरपरिषद प्रशासनाने एकमताने सत्रापुर काम गार छावणीजवळील घोष नावाच्या व्यक्तीच्या मालकी च्या ०.७६ हेक्टर जमिनीचा प्रस्ताव पाठवला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याअध्यक्षेत झाले ल्या बैठकीत खासदार बर्वे यांनी स्मशान भूमीसाठी (Kanhan cremation ground) भूसंपादनाकरिता निधीचा मुद्दा उपस्थित केला आणि निधीची मागणी केली. बैठकीत भूसंपादनाकरिता १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. एकंदरित बैठकीत जनहितार्थ विषयावर खासदार बर्वे यांनी डीपीसीची बैठक वादळी ठरवली.