तात्काळ पीकविमा मंजूर करण्यासाठी शासनाला कळवावे!
तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी!
मानोरा (Manora Farmer Pik Vima) : यावर्षी मानोरा तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस येऊन संत्रा फळबागाची फूट लवकर झाली व जून महिन्यामध्ये पावसाचा फार मोठा खंड पडला. त्यामुळे संत्रा फुलाची व फळांची पूर्णपणे गळण झाली आहे. व जून महिन्यातील पावसाच्या खंडामुळे मानोरा तालुक्यातील संत्राचे बागेचे पूर्णपणे 100 % नुकसान झाले आहे. त्यामुळे (Manora Farmer Pik Vima) तात्काळ संत्रा पिकांना विमा द्यावा, असे निवेदन तहसीलदार डॉ संतोष यावलीकर यांना दि. १३ ऑक्टोबर रोजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले आहे.
तालुक्यातील शेतकरी यांनी आतापर्यंत फळबाग संत्रावर चाळीस टक्के एवढा खर्च केला आहे. (Manora Farmer Pik Vima) संत्रा फळबागांना खर्च हा इतर पिकापेक्षा फार मोठ्या प्रमाणात लागत असतो, आणि त्या बागेमध्ये मध्ये इतर पिक सुद्धा येत नाही त्यामुळे मानोरा तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फळबाग संत्राचे फारमोठे पूर्णपणे नुकसान झाले असून, पटवारी व कृषी सहाय्यक हे नुकसान झालेल्या फळबागचे अहवाल बनवत असून तहसिलदार यांनी झालेल्या 100% नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. व फळबाग शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी.त्याचबरोबर तात्काळ फळबाग शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून पीकविमा मिळवून द्यावा.
संत्रा फळबाग पीक हे बहुवार्षिक असून सदर सदर (Manora Farmer Pik Vima) संत्रा बाग यापिकाची बहुवार्षिक पिकामध्ये नोंद करण्यात यावी, याकरीता संत्रा उत्पादक शेतकरी विशाल ठाकरे, मुकेश काळे, दामोदर भोयर, गजानन अढाव, ओमप्रकाश चव्हाण, प्रवीण पुसांडे, गुलाब पवार आदींनी तहसीलदार यांना निवेदन दिले.