डॉक्टरांच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
लाखनी (Eating Poisoned Case) : शहरातील गांधी शाळेसमोरील फुटपाथवर लावण्यात आलेल्या एका गुपचूप ठेल्यावरून चव घेणे नागरिकांना चांगलेच महागात पडले. या ठेल्यावरून गुपचूप खाल्ल्यानंतर सुमारे १० ते १२ जणांना उलटी, चक्कर व (Eating Poisoned Case) पोटदुखीच्या तक्रारी जाणवू लागल्या. यामध्ये सौम्य स्वरूपाची अन्न विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्काळ उपचारासाठी हे सर्व नागरिक डॉ.चंद्रशेखर निंबार्ते यांच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. डॉ. निंबार्ते यांनी तातडीने उपचार सुरू करून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर केली. डॉक्टरांनी यास गुपचुपमधील अस्वच्छतेमुळे झालेली (Eating Poisoned Case) विषबाधा असल्याचे स्पष्ट केले असून सद्य: स्थितीत सर्व रुग्ण धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती दिली. दरम्यान ही घटना समजताच संबंधित गुपचूप विक्रेता घटनास्थळावरून फरार झाला आहे.