Gadchiroli :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे(Department of Education) आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक गुणवत्तावंत पुरस्कार २०२५ साठी एकूण १२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांचा गौरव सोहळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.
११ सप्टेंबरला होणार पुरस्कार व सत्कार सोहळा
निवड झालेले गुणवत्तावंत शिक्षकामध्ये गोगांव येथील जि.प.शाळेच्या विषय शिक्षिका वनश्री जाधव, कुनघाडा रै. येथील जि.प. शाळेच्या विषय शिक्षिका प्रीती नवघडे , कोरची तालुक्यातील बिहीटेकला येथील जि.प. शाळेच्या विषय शिक्षिका शितल कुमरे , कुरखेडा तालुक्यातील बदबदा येथील जि.प. शाळेचे प्रा. शिक्षक बालाजी मुंडे , देसाईगंज तालुक्यातील बोडधा जि.प. शाळेचे शिक्षक प्रवीण मुंजमकर ,आरमोरी तालुक्यातील शिवणी बु. शाळेच्या विषय शिक्षिका हेमलता आखाडे , एटापल्ली तालुक्यातील डुम्मे जि.प. शाळेच्या विषय शिक्षिका सिंपल मुधोळकर, भामरागड तालुक्यातील आरेवाडा जि.प. शाळेतील पदवीधर शिक्षिका उज्वला बोगामी, मुलचेरा तालुक्यातील विजय नगर जि.प. शाळेतील शिक्षक मुरली गाइन , अहेरी तालुक्यातील शिवणीपाठ जि.प. शाळेतील शिक्षिका सुरेखा मेश्राम ,सिरोंचा तालुक्यातील नगरम जि.प. शाळेचे प्राथमिक शिक्षक रमेश रच्चावार आणि धानोरा तालुक्यातील उदेगाव जि.प. शाळेचे शिक्षक विलास दरडे यांचा समावेश आहे.
११ सप्टेंबर रोजी होणार्या या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे व प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी केले आहे.