Pandharkawda news :- घरुन शिकवणी वर्गास जातो असे सांगुन जाणार्या आठवीतील मुलगा आपल्या मित्रासोबत केळापुर येथील खुनी नदीच्या(River) धबधब्यावर(waterfall) पोहण्यास गेला होता. त्याला तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडुन मरण पावल्याची घटना १४ रोजी सकाळी १०.३० वाजता दरम्यान उघडकीस आली. भार्गव मधुकर झोडे १४ रा पांढरकवडा असे मृतकचे नाव आहे. भार्गव हा स्थानिक गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आठव्या वर्गात शिकत होता. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता तो नेहमी प्रमाणे घरुन शिकवणी वर्गास जात असल्याचे सांगुन गेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला
मात्र तो व त्याचे चार ते पाच मित्र शिकवणी वर्गास न जाता, खुनी नदीच्या धबधब्यावर पोहण्यास गेले होते. त्या धबधब्यावरील पाण्याचा भार्गवला अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यात अपयशी ठरले. भार्गव पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना मिळाल्याने त्यांनी पोलीसांना माहिती दिली. १३ रोजी खुनी नदीच्या पात्रात शोध मोहिम राबविण्यात आली. मात्र अधिक रात्र झाल्याने ती शोधमोहिम आज १४ रोजी सकाळ पासुन राबविण्यात आली. आज सकाळी १०.३० वाजता भार्गवचा मृतदेह पाण्यात मिळुन आला. या घटनेबाबत मृतक भार्गवचे मामा निलेश डोगरवार ४४ रा अर्जुणी जि गोंदिया यांनी पांढरकवडा पोलीसात (Police)फिर्याद नोंदविली आहे.




