विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार; आ. राजेश विटेकर यांचा पाठपुरावा
परभणी (Sonpeth ITI Building) : सोनपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) नवीन इमारत बांधकाम (Sonpeth ITI Building) व कार्यशाळेसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चालू असलेली गैरसोय लवकरच दूर होणार असून, संस्थेला स्वत:ची सुसज्ज इमारत मिळणार आहे.या कामासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यावर बांधकाम करण्यासाठी निधी मिळाला आहे.
सोनपेठ येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भव्यदिव्य इमारत व्हावी यासाठी निधीसाठी आ. राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar)यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर शासनाकडून निधीला मंजुरी मिळाली आहे. याबाबत विद्यार्थ्यांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Sonpeth ITI Building) सोनपेठ आयटीआयची स्थापना झाल्यापासून ही संस्था खाजगी इमारतीतच कार्यरत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास व प्रशिक्षणात अडचणी येत होत्या.
नवीन इमारतीमुळे आधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, वर्कशॉप आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे औद्योगिक प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सोनपेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला स्वतःची इमारत मिळणे ही येथील युवकांसाठी मोठी संधी उपल्ब्ध झाली आहे.
स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी
आयटीआय प्रशिक्षण संस्थेच्या (Sonpeth ITI Building) इमारत बांधकामासाठी१४ कोटी ९८ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.आता या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा आणि सुसज्ज कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आपण शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले. या निधीमुळे आयटीआयच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होईल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
– आ. राजेश विटेकर