नांदेडला झाला सौदा वसमतला झाली डील
वसमत (Fake Gold Case) : स्वस्तात सोने मिळते म्हणून एक किलो सोने खरेदी करून झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणाऱ्याला 15 लाख रुपयांचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे नांदेड येथील एका व्यापाऱ्याला सोन्याचे मनी देतो म्हणून नकली सोने देऊन 15 लाख रुपये दोन तीन जण फरार झाले आहेत वसमत येथे पैसे देणे सोने घेण्याची डील झाल्याने वसमत पोलिसांत तीन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संदर्भात वसमत शहर पोलीस ठाण्यात नांदेड येथील रहिवाशी व्यापारी संतोष लक्ष्मण बेलापुरे यांच्याकडे हिंदी भाषा बोलणारे कुटुंब आले त्यांनी आम्हाला खोदकाम करत असताना सोने सापडले आहे ते विकण्यास मदत करा असे सांगितले. संतोष बेलापुरे यांना (Fake Gold Case) सोने पाहून मोह आवरला नाही मदत करण्याऐवजी त्यांनी स्वतःच खरेदी करण्याचा निर्णय घेतला दाखवण्यास आणलेले सोन्याचे मनी तपासून घेतले ते सोन्याचे असल्याचे स्पष्ट झाल्याने सापडलेले सोने विकत घेण्याची तयारी दाखवली एक किलो सोने 15 लाख रुपयांत देण्याचा सौदा दोघांमध्ये झाला.
सोने देऊन पैसे घेण्याची डील करण्यासाठी वसमत येथे भेटण्याचे ठरले त्यावरून वसमत येथील आसेगाव टी पॉईंट जवळील हर्षनगर पाटीजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली पंधरालाख रुपये दिले व एक किलो सोने घेतले ,देणारे घेणारे दोन दिशेला निघून गेले महिन्याभरानंतर विकत घेतलेले एक किलो सोने काळे पडत असल्याचे पाहून बेलापूर कुटुंबियांना संशय आला.
घेतलेल्या सोन्याची तपासणी केली असता सोने नकली असल्याचे स्पष्ट झाले त्यावरून आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने तातडीने पोलिसात धाव घेण्यात आली भाग्यनगर पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला. मात्र पैसे देणे सोने (Fake Gold Case) घेणे ही घटना वसमत शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे प्रकरण वसमत शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. संतोष लक्ष्मण बेलापुरे राहणार नांदेड यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन अनोळखी पुरुषांसह एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, करत आहेत.
पोलिसांसमोर आव्हान
नांदेडच्या व्यापाऱ्याला नकली सोने देण्याचा सौदा झालेला असताना पैसे देण्या घेण्याचा व्यवहार करण्यासाठी वसमत शहराची निवड केली आता वसमत शहर पोलिसांसमोर फसवणूक करणारे तीन अनोळखी चोरटे शोधण्याचे अवघड आव्हान आहे. वसमत मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांवर रहिवाशांकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज वरून चोरटे शोधण्याचे अवघड आव्हान वसमत शहर पोलिसांसमोर आले आहे या प्रकरणाचा तपास कसा लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.