विधानसभा निवडणुक, उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन
पाथरी (Pathari Assembly Election) : पाथरी विधानसभा निवडणुकीत आपले भवितव्य आजमावण्यासाठी सोमवारी दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून (Pathari Assembly Election) निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार यांच्यासह काँग्रेस, राकाँ ,वंचित बहुजन आघाडी, रासप या पक्षाकडून व अपक्ष मिळून १७ जणांनी सोमवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत.
सोमवार २८ ऑक्टोबर रोजीउमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आ.सुरेश अंबादास वरपूडकर काँग्रेस ,निर्मलाताई उत्तमराव गवळी राष्ट्रवादी काँग्रेस,सईद खान बिरबल खान राष्ट्रीय समाज पक्ष ,सुरेश फड वंचित बहुजन आघाडी,माधवराव तुकाराम फड अपक्ष, गयाबाई माधवराव फड अपक्ष, रंगनाथ मोहन सोळंके अपक्ष, अर्जुन ज्ञानोबा भिसे अपक्ष, नारायण तुकाराम चव्हाण मराठवाडा मुक्ती मोर्चा , सचिन सुरेश निसर्गध बीआरएसपी या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पाथरी विधानसभा मतदारसंघात (Pathari Assembly Election) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक डॉ. राम अच्युतराव शिंदे अपक्ष ,गोविंद मदन घांडगे अपक्ष, अरुण सितारामजी कोल्हे अपक्ष, बापूराव रावसाहेब कोल्हे उमरा अपक्ष, नितीन रामराव लोहट अपक्ष, दादासाहेब रामराव टेंगसे अपक्ष, जगदीश बालासाहेब शिंदे अपक्ष , यांनीही शक्ती प्रदर्शन करत सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
महायुतीतील घटक पक्ष शिवसेना ( शिंदे गट ) कडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले सईद खान यांनी रासप मध्ये प्रवेश केला असून ते मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोबतच अपक्ष म्हणून माजी आमदार बाबाजींनी दुर्राणी , काँग्रेस कडून आ .सुरेश वरपूडकर ही शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात वाहने आणल्याने शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे रहदारीस व दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मंगळवारी उमेदवारी दाखल करताना होणाऱ्या शक्ती प्रदर्शनातही वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असुन हे टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिक उपायोजना करण्याची गरज आहे.
२२ ऑक्टोबर पासून सोमवार पर्यंत एकूण २६ उमेदवारानी २९ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त मंगळवार हा एक शेवटचा दिवस बाकी आहे, अशी माहिती (Pathari Assembly Election) निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे.