परभणी/पाथरी (Parbhani):- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पाथरी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून प्रशासनाच्या वतीने त्यांच्या खात्यावर दोन कोटी अठरा लाख रुपयांचे अनुदान वर्ग केले आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर पाथरी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
पाथरी तालुक्यातील सर्व योजनेचे अनुदान २ कोटी १८ लक्ष ५३ हजार १०० रु अनुदान बँक (Bank)खात्यात वर्ग करण्यात आले आहे. हे अनुदान तालुक्यातील ७ हजार ८५५ लाभार्थ्यांना मिळणार असून दिवाळी सणाच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा निराधारांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारकडून निराधारांना आधार म्हणुन आर्थिक अनुदान दिले जाते. हे अनुदान माहे ऑगष्ट ते सप्टेंबर २०२४ चे सदरील अनुदान दिवाळी पुर्वी त्याच्या खात्यात तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या(Cooperative Bank) ५ शाखा अंतर्गत अनुदान वर्ग करण्यात आले असुन लाभार्थ्यानी दोन महिन्याचे अनुदान आपल्या खात्यावरुन घ्यावेत असे आवाहन पाथरीचे तहसिलदार एस. एन. हार्देशवार, नायब तहसिलदार संगायो जि.के. येल्हारे यांनी केले आहे .