Pusad :- माहूर रोड वरील इंदिरानगर जवळ नप च्या कचरा डम्पिंग यार्ड मध्ये काल काही सफाई कर्मचार्यांना एका पोत्यात ५०० व १०० रु च्या नोटा मिळून आल्याचे वृत्त आहे. मात्र या संदर्भात कुठेही तक्रार झालेली नाही. काल डम्पिंग यार्ड मध्ये कचरा टाकण्यासाठी गेलेल्या नप आरोग्य विभागातील(Department of Health) काही कर्मचार्यांना एका पोत्यात नोटा आढळून आल्या.
नोटा चलन योग्य आहेत की बनावट?
त्या पैकी काही नोटा चांगल्या तर जळालेल्या अवस्थेत होत्या. कर्मचारी व बाजूच्या गावातील लोकांनी या नोटा घेऊन पळ काढल्याचे समजते. मात्र सापडलेल्या त्या नोटा चलन योग्य आहेत की बनावट? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर या नोटा चलन योग्य असतील तर कुणी तरी अनावधानाने घरातील कचर्यासोबत या नोटा फेकल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंग यार्ड परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) नादुरुस्त असल्याचे समजते. दरम्यान मागील काळात शहरात बनावट नोटा चे रॅकेट उघडकीस आले होते. त्या वेळी बनविण्यात आलेल्या नोटा पैकी ही या नोटा असू शकतात. याबाबत पोलीस चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही एवढे मात्र खरे.




