सतत पाऊस चालू असल्याने जनजीवन विस्कळीत!
कोरेगाव, चोप (Heavy Rain) : देसाईगंत तालुक्यात 29 जून पासून पावसाळा (Rainy Season) सुरुवात झाली. ते आज 8 जुलै तारखेला सुद्धा सतत पाऊस चालू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक जिल्हा मार्ग बंद झाल्याने प्रवासी जिथल्या तिथे अडकून पडलेले आहेत.
चोप नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद!
देसाईगंज तालुक्यात गेल्या 29 जून पाऊस पासून पावसाने सुरुवात केली ते 2 जुलैला उसंत दिली होती. पंरतू पुन्हा 3 जुलैपासून पाऊस सुरू झाला. तेव्हापासून सतत पाऊस पडल्याने चोप कोरेगाव परिसरातील तलाव, बोड्या 80% पेक्षा जास्त भरलेले आहेत. गेल्या 24 तासापासून सतत झालेल्या पावसाने तालुक्यातील नदी, नाले तुटुंब भरून वाहू लागले, तसेच शेतीचे बांधत तुंबले असल्याने धानपीक रोपनीचे कामे ठप्प झालेले आहेत, पहाटेपासूनच शंकरपूर, जोगीसाखरा, कोरेगाव चोप प्र. जिल्हा मार्ग क्रमांक एक येतील चोप नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद पडलेला आहे, आष्टी, उसेगाव, कोकडी, तुळशी एकलपूर, कोरेगाव जिल्हा मार्ग 49 तालुका देसाईगंज हाही बंद पडलेला आहे, तर कोंढाळा कुरुड, वडसा तालुका देसाईगंज रस्ता बंद पडलेला आहे, तर गडचिरोली, गोंदिया जिल्हा मार्ग बोळधा-केशोरी, वडेगाव पूलावर पाणी साचल्याने रस्ता बंद पडलेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस प्रशासन (Police Administration) वडेगाव पुलाशेजारी बंदोबस्त लागलेला आहे, हवामान खात्याकडून (Meteorological Department) मिळाल्या माहितीनुसार 9 जुलैपर्यंत, आरेंज अलर्ट (Orange Alert) असल्यामुळे आणि हीच परिस्थिती कायम असली, तर तालुक्यातील परिस्थिती आनखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली, व गोंदीया निल्यानां जोडनारा बोळधा, केशोरी मार्ग वडेगाव येथिल गाठवी नदीला पूरआल्याने गोंदीया जिल्यातील पोलीस प्रशासन सजग झाले व पूला सेजारी बंदोबस्त केला.