मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला!
परभणी (Revenue Week) : परभणीतील गंगाखेड येथे महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) व महसूल विभागाच्या निर्देशानुसार 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान, साजऱ्या झालेल्या महसूल सप्ताहाचा भव्य समारोप गुरुवार 7 ऑगस्ट रोजी गंगाखेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
महसूल विभागाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक!
परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत लेझीम पथक, तुतारी, उंट, घोड्यांसह महसूल विभागाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11 वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. या समारोप सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते तर उद्घाटन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेशदादा विटेकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, अनिता भालेराव, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, संगिता चव्हाण, उदयसिंह भोसले, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार माधव बोथीकर, उषाकिरण श्रुंगारे, कृऊबा सभापती साहेबराव भोसले, महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल सप्ताहात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित कामांना प्राधान्य देत त्या कामांची पूर्तता करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व लाभार्थ्यांना आधार किटसह विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी केले तर आभार पालम तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी मानले. समारोप सोहळ्याला महसूल विभागातील अधिकारी (Revenue Department Officer), कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाखेड, पालम व पूर्णा उपविभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.