हिंगोली (Lok Nyayalaya) : तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालय मुंबई आणि जिल्हा न्यायालय, परभणी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये शनिवारी (दि. 14) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित 1189 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका यांची वाद दाखलपूर्व 4678 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.
या (Lok Nyayalaya) लोकअदालतीमध्ये प्रलंबित 95 व वाद दाखलपूर्व 100 प्रकरणे अशी एकूण 195 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकन्यायालयात (Lok Nyayalaya) प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात 3 कोटी 33 लाख 24 हजार 503 रुपयांची तडजोडी आधारे रक्कम ठरविण्यात आली व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी तसेच विधिज्ञ समाविष्ठ असलेले एकूण पाच पॅनल करण्यात आले होते.
या लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-1 आर.व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.एन. माने-गाडेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी.के. नंदनवार,दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.यु. राजपूत, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
या लोकअदालतीला (Lok Nyayalaya) वकील संघाचे अध्यक्ष अँड. शिवशंकर वाबळे (उमरेकर), उपाध्यक्ष अँड. डी.पी. भाकरे, वकील संघाचे सचिव अँड. अजय वानखडे, वकील संघाचे सहसचिव अ.नवनाथ पारोकर व सर्व सन्माननीय वकील सभासद, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय पक्षकारास 28 लाखाचा धनादेश सुपूर्द….
“या लोकन्यायालयामध्ये (Lok Nyayalaya) गंगासागर संदीप सरकटे, वय 35 वर्षे हिचे पती नामे संदिप मोहन सरकटे ह्यांचा दिनांक 03 जानेवारी, 2023 रोजी हिंगोली ते जवळा-पळशी रोडवर नांदु-याजवळ मोटारसायकलने अपघात झाला होता. या अपघातामध्ये तिचे पती मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. सदरील दावा 28 लाखांमध्ये तडजोडी अंती निकाली निघाला आहे. या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयामुळे एका वर्षाच्या आत पक्षकाराला न्याय मिळाला आहे व लोकअदालतच्या दिवशीच तात्काळ कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. सदरील धनादेश पॅनल प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश-1 राजेंद्र वि. लोखंडे व पॅनल प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.एन. माने-गाडेकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.