हिंगोली(Hingoli):- सन २०२३ मधील नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने(Unseasonal rain) हजारो शेतकर्यांचे शेती पिकाचे नुकसान(crop damage) झाले होते. पंचनामे केल्यानंतर शासनाने १५४ कोटी रूपयाचे अनुदान मंजूर केले होते; परंतु ५८ हजार शेतकर्यांची ई-केवायसी (KYC)झालीच नसल्याने ३२ कोटी रूपयांचे अनुदान रखडले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर गावपातळीवर जिल्हा प्रशासनाच्या पथकाने पंचनामे केले होते. ज्यामध्ये २ लाख ५७ हजार शेतकर्यांचे १ लाख २३ हेक्टर क्षेत्राचे शेती पिकाचे नुकसान झाल्याने त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार शासनाने १६४ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केले होते.
तीन तालुक्यात अनुदानाची रक्कम वाटप झालीच नाही
त्यात हिंगोली तालुक्यात ५९ हजार ८१३ शेतकर्यांसाठी ४०.७४ कोटी रूपये, वसमत तालुक्यातील २७ हजार १६४ शेतकर्यांसाठी २४.३७ कोटी रूपये, औंढा नागनाथ तालुक्यातील ५७ हजार ९५६ शेतकर्यांसाठी ३३.४१ कोटी रूपये, कळमनुरी तालुक्यातील ५१ हजार २३७ शेतकर्यांसाठी ३१.७३ कोटी रूपये तर सेनगाव तालुक्यातील ६१ हजार ४११ शेतकर्यांसाठी ३७.५९ कोटी रूपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. शासनस्तरावरून १ लाख ६५ हजार शेतकर्यांसाठी ९८.६८ कोटी रूपयांची रक्कम संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात आली होती; परंतु ई-केवायसी होत नसल्याने तब्बल ५८ हजार शेतकर्यांचे ३२.७५ कोटी रूपयांचे अनुदान शेतकर्यांच्या बँक(Bank)खात्यावर जमा झालेच नाही. त्यात प्रामुख्याने हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यातील एकाही शेतकर्याच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही त्यामुळे हे अनुदान केव्हा मिळणार, यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत.
अनुदानासाठी अनेक वेळा आंदोलन
नुकसानग्रस्त शेतकर्यांना अनुदान मिळाले नसल्याने अनेक वेळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले होते. वारंवार प्रशासनाने अनुदान देण्याच्या हालचाली सुरू केल्या; परंतु नंतर थंडबस्त्यात गेल्या. तीन तालुक्यात शेतकर्यांना अनुदानाची रक्कम मिळालीच नाही