परभणीच्या गंगाखेड येथील महातपुरी येथील घटना
परभणी/गंगाखेड (Godavari River Death Case) : पोहण्यासाठी गेलेला 32 वर्षीय इसम गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची घटना रविवार 20 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील महातपुरी येथे घडली असुन नदी पात्रात बुडालेल्या इसमाचा शोध घेणे सुरु आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील शेख वसीम शेख तहसीन वय अंदाजे 32 वर्ष हा इसम रविवार 20 एप्रिल रोजी पोहण्यासाठी महातपुरी येथील देवीच्या मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात गेला होता. चिंचटाकळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात मोठया प्रमाणात खोल (Godavari River Death Case) पाणी असल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने शेख वसीम शेख तहसीन हा इसम पाण्यात बुडाला.
ही माहिती समजताच महातपुरी येथील दहा ते पंधरा इसमांनी (Godavari River Death Case) पाण्यात उड्या मारून त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. पाण्यात बुडालेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी गंगाखेड येथील तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे, मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर व तलाठी अनिल खळीकर यांनी गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना महातपुरी येथे पाचारण केले असुन सायंकाळी 6:12 वाजेच्या सुमारास महातपुरी येथे पोहचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध सुरु केला.
मात्र सायंकाळी 7 वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नसल्यामुळे स्थानिक भोई समाज बांधव व अन्य तरुणांच्या मदतीने शोध मोहिमेला गती देण्यात आली होती. वृत्त लिहीपर्यंत (Godavari River Death Case) गोदावरी नदी पात्रात बुडालेल्या इसमाचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मनोज राठोड व विजय चाफळे यांनी घटनास्थळी भेट दिली.