Hinganghat :- खेळताना पाण्याच्या टाक्यात पडल्याने पाण्यात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला. ही घटना घाटसावली येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील घाटसावली येथील टाले कुटुंबातील तीन वर्षांची चिमुकली अधीरा प्रदीप टाले ही घरी खेळत होती.
खेळताना घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पडली
दरम्यान, खेळताना घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पडली. पडल्यावर आवाज आल्याने तेथे जाऊन पाहिले असता अधिरा पाण्याच्या टाक्यात पडली होती. बाहेर काढले असता ती हालचाल करीत नव्हती. तिला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत मृतक अधिराचे मोठे वडील महेंद्र टाले यांच्या तक्रारीवरून वडनेर पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास ठाणेदार घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सचिन रोकडे करीत आहेत.