Gadchiroli :- गडचिरोली जिल्हयाच्या सिमेंवर व छत्तीसगड लागुन कोरची तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (Health Center) बोटेकसा येथे आरमोरी क्षेत्राचे चे आमदार रामदासजी मसराम यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील विविध सुविधा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषध साठा आणि रुग्णसेवेची पाहणी केली. यावेळी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची स्थिती आणि अडचणी जाणून घेतल्या.
सुविधा संबंधित अडचणी सांगितल्यानंतर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले
विशेषतः रुग्णालयात भरती असलेल्या काही रुग्णांशी आमदार मसराम यांनी थेट संवाद साधत उपचारांबाबत समाधान व्यक्त केले की नाही, याबाबत विचारणा केली. रुग्णांनी काही तांत्रिक व सुविधा संबंधित अडचणी सांगितल्यानंतर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
“ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सुविधा सक्षम असणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रशासनाने तत्पर राहणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. त्यावेळी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, धनपाल मिसार,आशिष अग्रवाल, जगदीश कपूरदेहरिया ,डॉ. राजेश सोनकुकरा, डॉ. अंबादे मॅडम, कनिष्ठ बाबू ठाकरे, तसेच आरोग्य अधिकारी, बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.