Wardha :- हातचलाखीने एटीएम कार्ड काढून स्वत:जवळ ठेवून त्याचा गैरवापर करत ५० हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना हिंगणघाट येथे घडली.
हिंगणघाट येथील शरद तडस यांनी बँकेतून एटीएम कार्ड (ATM Card) काढले. त्या कार्डचा पिन सुरळीत करण्याकरिता गेल्यानंतर कर्मचार्याने एटीएम कार्डचा पीन सुरळीत करून दिला. दरम्यान गडबडीत ते बँकेतमून गेले.
घरी गेल्यानंतर त्यांना एटीएम दिसले नाही. बँकेत चौकशीस गेल्यानंतर त्यांना एटीएम कार्ड तुम्हीच घेऊन गेल्याचे उत्तर मिळाले. शोध घेऊनही एटीएम कार्ड मिळाले नाही. दरम्यान त्यांना दहा हजार रुपये प्रती पाच वेळा असे ५० हजारु रुपये काढल्या गेल्याचे मॅसेज मोबाईलवर आले. त्यामुळे त्यांनी एटीमएम व नेट बँकींगचे (Net Banking) व्यवहार बंद केले. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.