सह पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश
गडचिरोली (Wild Elephant Attack) : आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील रहिवासी इंदिरा सहारे यांना रानटी हत्तीच्या हल्ल्यात नुकतेच गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचार सुरू आहेत. या (Wild Elephant Attack) उपचारादरम्यानच राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत त्यांच्याशी संवाद साधला आणि आस्थेने त्यांच्या तब्येतीची चौकशी करून वनविभागातर्पेâ नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.
सहारे यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी अॅड. जयस्वाल यांनी वनविभाग व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना स्पष्ट निर्देश दिले.
(Wild Elephant Attack) वन्य प्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्यात यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.या प्रसंगी आ. रामदास मसराम यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते