अंतिम मुदतीला ३ दिवस शिल्लक
नाफेड कडे ३१ जानेवारीपर्यंत खरेदीचे आव्हान
परभणीतील स्थिती
नाफेड कडे ३१ जानेवारीपर्यंत खरेदीचे आव्हान
परभणीतील स्थिती
परभणी (Soybeans price) : हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२रुपये ) सोयाबीन विक्रीसाठी परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत १२ केंद्रांवर जिल्ह्यातील २३८०३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. सोमवारपर्यंत पणन महासंघामार्फत (नाफेड) (ता.२७) १२१६० शेतकऱ्यांची १ लाख २८ हजार ७६१ क्विंटल खरेदी झाली आहे. अवघ्या तीन दिवसात आता ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित ११ हजार ६४३ शेतकऱ्यांचे म्हणजेच ऑनलाइन नोंदणी केलेले जिल्ह्यातील ५१ टक्के शेतकरी हमीभाव खरेदी पासून वंचित राहण्याचे चिन्ह आहेत. ३ दिवसांत सोयाबीन खरेदी (Soybeans price) करण्याचे आव्हान पणन महासंघाकडे (नाफेड) कडे आहे.
परभणी जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर (Soybeans price) सोयाबीन विक्रीकरिता २३८०३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ११ खरेदी केंद्रांवर ४ हजार ५६ शेतकऱ्यांच्या ८१ हजार ३०८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. आजवर (ता १६) १० केंद्रांवरच्या ३ हजार ३८ शेतकऱ्यांना ६२ हजार ३७५ क्विंटल सोयाबीनचे ३० कोटी ५१ लाख ४२ हजार ६५८ रुपये चुकारे अदा करण्यात आले. आता जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांचे येत्या ३१ जानेवारीपर्यंत ११ हजार ६४३ शेतकऱ्यांना एसएमएस देण्यासह त्यांची खरेदी करण्याचे आव्हान पणन महासंघाकडे आहे.
तीन दिवसात साडेअकरा हजार शेतकऱ्यांची खरेदी कशी होणार.?
पणन महासंघाद्वारे सोयाबीनच्या हमीभाव खरेदी (Soybeans price) करता पहिले १२ जानेवारी पर्यंत मुदत होती. त्यानंतर आता 31 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यातही जिल्ह्यातील ११६४३ शेतकऱ्यांचे येत्या तीन दिवसात (३१ जानेवारीपर्यंत) सोयाबीन खरेदी करण्याचे आव्हान पणन महासंघाकडे आहे. पण तीन दिवसात एवढ्या शेतकऱ्यांची खरेदी कशी होणार हा प्रश्न उपस्थित ला जात आहे.
खरेदी ची तारीख वाढण्याची सांगता येणार नाही
सोयाबीनच्या हमीभाव खरेदी करिता जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची (Soybeans price) सोयाबीन खरेदी अद्यापही बाकी आहे. मात्र ३१ जानेवारी ही खरेदीची शेवटची मुदत असल्याने खरेदी ची तारीख वाढेल की नाही हे सांगू शकत नाही. याबाबत वरच्या स्तरावर पत्र व्यवहारही चालू आहे..
-कुंडलिक शेवाळे, जिल्हा पणन अधिकारी, परभणी