Desaiganj :- पुर्व विदर्भातील गर्द वनराईने नटलेल्या समस्त झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर असलेल्या देसाईगंज शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या (Ideal colleges) प्रांगणात दि.४ व ५ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला देशभरातील नामवंत कलावंत,नेते-अभिनेते,रंगकर्मी यांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान संमेलनाचे यथायोग्य संचालन करण्यासाठी नाट्य संविधानाच्या (Drama Constitution) विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत.
 नाट्य संविधानाच्या विविध समित्या गठित करण्यात आल्या
यात प्रामुख्याने आर्थिक समितीवर संमेलनाध्यक्ष आत्माराम खोब्रागडे,पद्मश्री  डॉ.परशुराम खुणे,विजय सहारे,युवराज गोंगले, परमानंद गहाणे,अनिरुद्ध वनकर,अंकुश पेटकर, प्रा.डॉ.शेखर डोंगरे,चेतन वडगाये, शेखर पटले, हिरालाल सहारे,युवराज प्रधान,नितीन नाकाडे, संदीप राऊत, राज मराठे, मुकेश गेडाम, विलास कावळे यांचा समावेश करण्यात आला आहे. स्मरणिका संपादक मंडळात राजकुमार मुसने, प्रा. सदानंद बोरकर, प्रा.डॉ.धानोरकर, डॉ. शेखर डोंगरे, प्रा.जे.टी.मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रसिद्धी प्रमुखपदी किशोर मेश्राम, रुपेश मेश्राम, प्रल्हाद मेश्राम, पुंडलिक भांडेकर, प्रणय देवगडे, होमदेव कोशमशिले, किरपाल सयाम, भावेश कोटांगले, अतुल बुराडे, पुण्यशील कोचे, शरद ठाकरे, भुवन लिल्हारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.संमेलन भव्य दिव्य करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले असल्याची माहिती झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांनी दिली आहे.
   