मानोरा(Washim):- डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळ, कारंजा – मानोरा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, मानोरा तालुका अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र पोहरादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी शहरातील खुपसे मंगल कार्यालयात भव्य मोफत रक्त तपासणी (Blood test) शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मोफत रक्त तपासणी शिबिराचा ६०० महिलांनी लाभ घेतला.
गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, सी बी सी तपासणी, सिकलसेल तपासणी, सीए – १२५ / कॅन्सर टूमर, डायबिटीज तपासणी, थायरॉईडची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यानी केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेश चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक डॉ निकिता महेश चव्हाण, त्रिशूला घ्यार सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी त्रिशूला घ्यार, कार्यक्रम अधिकारी प्रांजली वासाके, कुसुम रुपने मॅडम माविम व्यवस्थापक कुसुम रुमने मॅडम, अध्यक्षा सौ. रेखा राऊत, सौ. मंदाताई राठोड , अमोल राऊत, नितेश लवटे, तलवारे यांची उपस्थिती होती. या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग घेतला आणि मोफत रक्त तपासणीचा लाभ घेतला. यावेळी विविध आजारावर महीला भगिनींना त्वचा रोग तज्ञ(Dermatologist) डॉ निकिता महेश चव्हाण व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ महेश चव्हाण यांनी शिबिरात मोलाचे मार्गदर्शन केले.




