सेनगाव (Sengaon Panchayat Samiti) : तालुक्यातील पंचायत समितीच्या वीज गणाचे 13 आक्टोबर सोमवार रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत झाली असून काही गणाच्या आरक्षणात बदल झाला आहे तर काही गण परत त्याच वर्गासाठी सुटले आहे दरम्यान आरक्षणा नंतर पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी वेगवान होणार आहे.
सेनगाव तालुक्यात पंचायत समितीचे (Sengaon Panchayat Samiti) 20 गण आहेत. गणाच्या आरक्षणाची विविध पक्षाच्या कार्यकर्ते मध्ये उत्सुकता सिंगेला पोहोचली होती. आरक्षणानंतरच निवडणूक कामाला जोमाने लागण्याचा कार्यकर्त्यांनी निर्णय केला होता. सोमवार तारीख 13 रोजी तहसील कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू झाली.
(ओपन)सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिलासाठी गोरेगाव पानकनेरगाव, हत्ता भानखेडा, सापडगाव हे पाच गण आरक्षित झाले तर सर्वसाधारण खुला पुरुष प्रवर्गासाठी कडोळी, जवळा बुद्रुक, साखरा, ब्रम्हवाडी, पुसेगाव हे गण सुटले आहेत. अनुसूचित जाती पुरुष (एस सी) कहाकर बुद्रुक, बाभूळगाव, सवना तर माझोड महिलांसाठी आरक्षित झाले आहे मकोडीगण (एसटी) अनुसूचित जमातीसाठी सुटला आहे. (ओबीसी) नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष वरुड चक्रपाण, वटकळी तर महिला करिता कापडसिंगी, आजेगाव, जयपुर, गन आरक्षित झाले आहेत.
सेनगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या (Sengaon Panchayat Samiti) नुकत्याच सुटलेल्या आरक्षणात काही अंशी बदल झाला असून, आरक्षण सुटल्यानंतरच निवडणूक कामाला मोठ्या जोमाने लागण्याचा निर्णय विविध पक्षाच्या नवनिर्वाचित उमेदवारांनी घेतल्यामुळे खरी रणधुमाळी आता सुरू होणार आहे. आगामी काळात पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी कशी राहील हे चित्र पाहायला मिळणार आहे.