Akola crime :- अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळीत गोवंश पकडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन पोलिसांना मारहाण (Beating)झाली. दहा व्यक्तीवर पोलिसांनी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे (crime)दाखल केलेआहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीऩुसार, बार्शीटाकळी शहरातील ग्रीन कॉलनी भागात पोलिसांनी छापा टाकून अवैधरीत्या बांधून ठेवलेले गोवंश जातीचे १० जनावरे ताब्यात घेतले आहेत. या जनावरांची एकूण किंमत सुमारे ₹३.४३ लाख इतकी आहे, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजय भिमराव वानखडे वय 36 यांनी दिलेली फिर्याद दिली आहे, की पोलिसांना ३० ऑगस्टच्या रात्री गुप्त माहिती मिळाली होती की, सै. सिद्दीक सै. राजीक यांनी आपल्या गोठ्यात अवैध कत्तलीसाठी बैल व गाई बांधून ठेवल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकल्यावर तेथे अनेक बैल, गाई व वासरे आढळून आली.
पोलिस जनावरे ताब्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने परिसरातील लोकांना गोळा करून जमाव जमवला
जनावरांचे कागदपत्र व मालकी हक्काचे पुरावे विचारले असता आरोपी काहीही दाखवू शकला नाही. पोलिस जनावरे ताब्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने परिसरातील लोकांना गोळा करून जमाव जमवला. या जमावाने पोलिसांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली व “जनावर नेऊ नका” असा गोंधळ घातला. जमावात महिला देखील होत्या. या प्रकरणात आरोपी सैय्यद सिद्दीक सै. राजीक वय 40 , मो. आरिफ मो. हुसैन 35, मो. साकिब मो. जाकीर 40 , सै. वाजिद सै. राजीक 45 , मो. जाकीर मो. हुसैन 54, मो. आशिक मो. हुसैन 44, मो. वासीफ मो. जाकीर 18 , अफसाना 40, मुमताज बी मो जाकीर 40 , आणि अफरोजा परविन 30 सर्व रा.बार्शीटाकळी यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(ब), ९, कलम ११ (जनावरांवरील क्रूरता), तसेच १३२,२९६,१२१(१),१८९(२)१९१(२),१९०,११५(२),३५१(२) भारतीय दंड संहिता (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांची तपास एसडीपीओ वैशाळी मुळे, पुलिस निरिक्षक प्रविण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ASI फराज़ शेख करित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ए एस आय पोलीस अधिकारी व पाटील नामक पोलिसांना मारहाण झाल्याची खमंग चर्चा सर्वत्र होत आहे.