आग नियंत्रणात; मोठी दुर्घटना टळली
खमारी/बुटी (Bhilewada Massive fire) : भंडारा तालुक्यातील महामार्गावरील भिलेवाडा येथे दि.२० जून रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान विनोद राखडे नामक शेतकर्याच्या स्लॅबच्या घरात ठेवलेल्या कुटाराला आग लागली. (Bhilewada Massive fire) आग लागल्याचे लक्षात येताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील कुटार ओढत असताना राजेश राखडे नामक तरुण धुराने गुदमरल्याने बेशुध्द पडला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
भिलेवाडा येथील शेतकरी पशुपालक विनोद राखडे यांनी पाळीव जनावरांचा चारा आपल्या स्लॅबच्या घरात साठवणूक करून ठेवला होता. दि.२० जून रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान अचानक कुटाराला आग लागली. (Bhilewada Massive fire) घरातून धूर निघत असल्याचे पाहून गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, आगीत कुटार जळू नये म्हणून राजेश राखडे नामक तरुण कुटार ओढण्याच्या प्रयत्नात धुरामुळे गुदमरून बेशुध्द पडला. त्याला भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी जि.प.सदस्य विनोद बांते, उपसरपंच लोकेश बांते, पोलीस पाटील सचिन नेवारे यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याचा गावकर्यांच्या मदतीने प्रयत्न केला. आगीची माहिती पोलीस स्टेशन कारधा येथे देण्यात आली. माहिती मिळताच पोहवा विनय साठवणे, रजनिकांत मुरकुटे, अरुण रेवतकर यांनी घटनास्थळ गाठले.
घटनास्थळी भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. आगग्रस्त घराला लागूनच इतरांची घरे असल्याने आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. (Bhilewada Massive fire) आगीत सदर शेतकरी पशुपालकाचे जवळपास ८० हजारांचे नुकसान झाले असून जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकर्यांकडून केली आहे.