परभणी (Parbhani) :- सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी या रस्त्यावर सेलू ते पाथरी दरम्यान देऊळगाव फाटा ते गुगळी धामणगाव या ठिकाणी ओमिनी एम.एच. ४ डी.बी.६५४१ या वाहनाच्या चालकाने भरधाव वाहन चालवून अपघातास (Accident) कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीसात या ओमीनीच्या चालकावर २१ मार्च रोजी दुपारी ५:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलु-पाथरी रस्त्यावरील घटना घटनेतील गंभीर जखमीचे झाले निधन
या अपघातात ओमिनी मधील गंभीर जखमी बद्रोद्दीन अन्सारी वय ६२ वर्षे याचे दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान निधन (Death)झाले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी या रस्त्यावर गुगळी धामणगाव ते देऊळगाव फाटा परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवर वय ५८ वर्षे आपल्या कार क्रमांक एम एच ४६ए.बी.४०४० ने गुगळी धामणगाव येथून सेलू कडे येत होते तर याच मार्गावरून ओमनी कार मधून सेलु हुन रमजान सना निमित्त ठेवलेल्या रोजा नंतरच्या कार्यक्रमासाठी बद्रोद्दीन अन्सारी ६२ वर्षे, मुक्तार अन्सारी वय ३१ वर्षे हे पाथरी येथे जात होते. उभयतांच्या दोन्ही वाहनात झालेल्या अपघातात माधव लोकुलवार जखमी झाले तर ओमिनी मधील दोघांनाही जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले.
ओमिनी मधील दोघांनाही जबर मार
हा अपघात १४ मार्च रोजी दुपारी ५:१५ वाजता झाला. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवार यांनी सुमारे एका आठवड्यानंतर म्हणजेच२१ मार्च रोजी दुपारी ५:३० वाजता तक्रार देऊन भरधाव ओमिनी वाहन क्रमांकावर विविध कलमे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये कारचे सुमारे १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत. दरम्यान या दोन्ही वाहनात झालेल्या अपघातानंतर ओमिनी मधील बद्रोद्दीन अन्सारी वय ६२ वर्षे यांचे झालेल्या अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे प्रथम सेलू ,परभणी व पुढे छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे. तर चालक याच्यावर उपचार सुरू आहेत. ओमिनी चालक अथवा मयता कडून अद्यापही फिर्याद ठाण्यात दाखल करण्यात आली नाही. याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.




