Parbhani:- झरी येथील प्रथमेश पुरुषोत्तम मठपती यांची मर्चंट नेव्ही (Merchant Navy) कॅप्टन पदी निवड झाली. झरी येथून प्रथम नेव्ही कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवला. येथील शेतकरी पुरुषोत्तम कमलाकर मठपती यांचा झरी येथे शेती व्यवसाय असून त्यांचा मुलगा प्रथमेश हा इयत्ता पाचवी पासूनच नेव्ही विषय आकर्षण होते. त्याचे प्राथमिक शिक्षण झरी येथे झाले तसेच सातवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण अराबिंदो अक्षर ज्योती विद्यालय परभणी येथे झाले दहावी झाल्या नंतर परभणी येथे नेव्ही साठी आयएमयूसीईटी (IMUCET)ची सात महिने तयारी केली.
ग्रामसभेमध्ये सरपंच दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व संपूर्ण नागरिकांच्या समोर त्याचा सत्कार
बी.पी. मरीन ही नवी मुंबई येथे असलेली सागरी प्रशिक्षण अकादमीत त्याने आपले शिक्षण पूर्ण करून मर्चंट नेव्ही अधिकारी या पदाला गवसणी घातली. अन् आई वडलांचे स्वप्न झाले पूर्ण. पुरुषोत्तम मठपती यांची शेती झरी येथे पिंपळा रोड वर असून अल्प भूधारक शेतकरी (Farmer) असल्यामुळे कुटुंबाचा गाडा हकण्या साठी त्यांची पत्नी पूनम मठपती याही ग्रह उद्योग करून आपल्या संसारात हातभार लावत होत्या शेतकरी म्हटल्यावर त्याच्या घरात आठवा विश्वाचे दारिद्र्य असल्यामुळे दोघांच्या मदतीने कसे तरी घर चालत होते परंतु त्यांचा मुलगा प्रथमेश हा मर्चंट नेव्ही अधिकारी झाल्यामुळे पार आनंद गगनात मावेनासा झाला जरी मधील पहिला मर्चंट नेव्ही अधिकारी झाल्यामुळे प्रथमेश याचा आज ग्रामपंचायत कार्यालय झरी येथे ग्रामसभा असल्यामुळे या ग्रामसभेमध्ये सरपंच दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व संपूर्ण नागरिकांच्या समोर त्याचा सत्कार करण्यात आला.