Manora :- सतलोक आश्रम ढवळीपुरी येथे दि. ६, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सतत तीन दिवसा चालणाऱ्या या समारंभात लाखो भक्त सहभागी होऊन अध्यात्म, सेवा आणि समाज सुधारणा यांचा संगम अनुभवास येणार आहे. तरी वाशिम जिल्हयातील भक्तांनी (Devotees)या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रामपाल जी महाराजांचे असीम भगत प्रकाश जाधव यांनी केले आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
संत रामपाल जी महाराजांचा जन्म ८ सप्टेंबर १९५१ रोजी हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्हयातील धनाना या गावात झाला होता. त्यामुळे हा दिवस दरवर्षी त्यांच्या अनुयायाकडून अवतरण दिवस म्हणून साथ देने साजरा केला जातो. भक्तांच्या मते संत रामपाल जी महाराज यांनी सर्व धर्म ग्रंथांमधून प्रमाण देत हे स्पष्ट केले आहे की, मनुष्य जन्म हा फक्त परमात्मा प्राप्तीसाठी आहे. त्यांच्या शिकवणीमुळे अनुयायांना शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच अध्यात्मिक लाभ होत असून व्यसनमुक्ती (Addiction) आणि सामाजिक मार्गाचा लाभ मिळतो. सोहळा समारंभासाठी देशभरातून व प्रदेशातूनही मोठ्या संख्येने भक्त येण्याची शक्यता आहे. आयोजकांनी वाहतूक, निवास आणि सुरक्षेची विशेष तयारी केलेली आहे. भक्त वर्गामध्ये या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता असून ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान ढवळपुरी येथे अध्यात्म आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम पहावयास मिळणार आहे. तरी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.