Hingoli :- मराठा संघर्षाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी २७ ऑगस्टपासून अंतरवली सराटी ते मुंबई (Mumbai) असा दोन दिवसांचा प्रवास करून २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.या आंदोलनात सहभागी आंदोलकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथून मोठ्या प्रमाणावर अन्नपुरवठा मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे.
या अन्नपुरवठ्यात –
-
२ क्विंटल पोळ्या
-
१.५ क्विंटल मिरचीचा ठेचा
-
२ क्विंटल चिवडा
-
पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स
हे सर्व वाहनाद्वारे १ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना करण्यात आले. २ सप्टेंबरच्या सकाळी हे साहित्य आझाद मैदानावर पोहोचणार असून तेथे आंदोलकांना भोजन पुरवले जाणार आहे. दरम्यान, रिसोड येथील रोहित तांदळे यांनीही पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देऊन मदतीचा हात पुढे केला. मराठा समाजाच्या लढ्यात प्रत्येक घटक सक्रियपणे सहभागी होत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.