कुणाचा ताळमेळ नाही; सर्किट करतात डिस्कनेक्ट
भंडारा (Provident Fund Office) : भंडारा वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय (माध्यमिक) येथील टेलिफोनचा रिसीव्हर बाजूला ठेवला जातो. शाळांच्या शिक्षक कर्मचार्यांनी (Provident Fund Office) वेतन पथकाच्या अधिकार्यांशी टेलिफोनवर संपर्क टाळण्यासाठी रिसीव्हर बाजूला ठेवला जातो. टेलिफोन बंद करण्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आठवडा होत आलाय. मात्र माध्यमिक वेतन पथकाच्या अधिक्षकांनी वेतनाच्या लेखाशीर्षकात व्हाउचर घातले नाही. याबाबत विचारणा करण्यास विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी (Provident Fund Office) वेतन पथकाच्या कार्यालयात धडक दिली. त्यावेळी वेतन पथक कार्यालयातील टेलिफोनचा संच अस्थाव्यस्थ व बंद असल्याचे दिसून आले. तसेच टेलिफोन संचाचा रिसिव्हर बाजूला ठेवल्याचे आढळून आले.
मंगळवार दि. २४ जून रोजी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी (Provident Fund Office) वेतन पथकाला भेट दिली. त्यावेळी अधिक्षकांच्या कार्यालयातील टेलिफोन संच सुरू आहे का? याची विचारणा कर्मचार्यांना केली. टेलिफोन संच टिनाच्या कपाटावर पडून होते. तो संच व्यवस्थित करून वेतन पथक अधिक्षक यांच्या टेबलावर ठेवण्याच्या प्रयत्न एका कर्मचार्यानी केला.
परंतू आधी आम्हाला छायाचित्र घेऊ द्या, असे पदाधिकार्यांनी सांगितले. त्यानंतर त्या टेलिफोन संचाचा खालच्या भागातील एक बटण बंद करून ठेवण्यात आल्याचा प्रकार दिसून आला. वेतन पथकाच्या एका कर्मचार्यांनी टेलिफोनचे लागलेले कनेक्शन व बटन व्यवस्थित केले. त्यानंतर कुठे वेतन पथकाच्या कार्यालयातील टेलीफोन नंबरवर रिंग जाऊ लागली.
कपाटावर असतो टेलिफोन संच
सरकारी कार्यालयातील टेलिफोन संच बहुदा (Provident Fund Office) अधिकार्यांच्या टेबलावर ठेवलेला दिसून येतो. मात्र, भंडारा वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयातील टेलिफोन संच टिन पत्र्याच्या कपाटावर ठेवलेला असतो. त्यामुळे तो फोन अडगळीत ठेवल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.
हलचल रजिस्टर आहे पण…
प्रत्येक सरकारी कार्यालयात हलचल रजिस्टर असतो. कार्यालयीन वेळेत अधिकार्यांना व कर्मचार्यांना काही कामे आली तर त्यांना हलचल रजिस्टर वर नोंद करून घेणे अनिवार्य असते. वेतन पथकातही हलचल रजिस्टर आहे. त्या कार्यालयातील सर्व कर्मचार्यांच्या नोंदी दिसून आल्या. परंतू दि. ६ जुलै २०२३ रोजी अधिक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रभा दुपारे यांच्या हलचल रजिस्टरवर एकही नोंद नाही. याचा अर्थ त्या कोणत्याही कार्यालयात कार्यालयीन वेळेत एकही वेळेस कामासाठी गेल्या नाहीत, असा अर्थ होतो.
कार्यालयात संपर्क नंबरच नाही
वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयात असणार्या कोणत्याही फलकावर प्रमुख अधिकार्यांचे संपर्क क्रमांक लिहिलेले नाहीत. (Provident Fund Office) वेतन पथकानी व्हाट्सअप समूह तयार केला आहे. परंतू तो समूह ‘ओन्ली एडमिन’ साठी असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्या समूहावर मेसेज घालू शकत नाही. तसेच बर्याच मुख्याध्यापकांजवळ अधिक्षकांचे व काही कर्मचार्यांचे मोबाईल नंबर असतांना सुद्धा शिक्षकांचे फोन उचलले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पायपीट करत भंडारा वेतन पथकाला कर्मचार्यांना यावे लागते.